Dictionaries | References

आवडणें

   
Script: Devanagari
See also:  आवाडणें

आवडणें     

स.क्रि.  दिसणें ; वाटणें ; भासणें . तो मनुष्यासारिखा तरी आवडे । परी मनुष्यत्व तया न घडे - ज्ञा ४ . १०० .
स.क्रि.  ( राजा . कुण . ) शौचविधी नंतर ढुंगण धुणें ; कुल्ले धुणें . [ अवटणें ; सं . आ + वृत ; प्रा . आवट्ट = शोषणें ? ]
स.क्रि.  पसंत असणें ; रुचणें ; आनंददायक किंवा मनाजोगें असणें . आवडून घेणें - आपली प्रीति बळेंच ठेवणें ; आपल्याला प्रेमबध्द करुन घेणें . [ आवड ; सिं . आउडणु ]

आवडणें     

आवडे सोन्याची शृंखला, खुपे फुलाचीही माला
साखळी सोन्याची असली तरी ती खुपत नाही पण माळ फुलांचीहि असली तरी ती खुपते. एखाद्या श्रीमंतीला भुलणार्‍या व साध्या गोष्टीला नाके मुरडणार्‍या व्यक्तीबद्दल योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP