|
बहु- अनेक या अर्थाचा उपसर्ग multi cellular बहु-अनेक कोशिक अनेक कोशिकांचे बनलेले, शरीर किंवा अवयव multi ciliate बहुकेसली अनेक सूक्ष्म धागे (प्राकलाचे) असलेले, उदा. सायकस किंवा नेफोलेपिस नेचा यांची रेतुके, इडोगोनियम शैवलाची बीजुके, गंतुके multi costate बहुसिराल अनेक प्रमुख शिरा असलेले, उदा. बोर, घोटवेल यांची पाने multi dentate बहुदंती अनेक दाते असलेले, करवती, उदा. जास्वंदीचे पान multi fid बहुखंडित अनेक खंड पडलेले, उदा. कोमलता, भद्रदंती (Jatropha multifida L.) यांची पाने multi florus बहुपुष्पी अनेक फुले असलेली (वनस्पती, अक्ष इ.) multi foliate (digitate) बहुदली अनेक दले एका बिंदूतून निघत असलेले संयुक्त पान, उदा. सावर, पून, गोरखचिंच इ. multi foliatus बहुपर्णी भरपूर पाने असलेली (वनस्पती) multi locular बहुपुटक अनेक कप्पे असलेला (किंजपुट) उदा. भेंडी, धोतरा, लिंबू इ. multi nuclear, multi nucleate बहुप्रकली, बहुकेंद्रक अनेक प्रकले असलेली (कोशिका) उदा. व्हाउचेरिया व क्लॅडोफोरा शैवले, म्यूकर बुरशी multi parous बहुशाखी, बहवाक्षी मुख्य अक्षावर टोकास वाढ थांबून बाजूस अनेक शाखा असलेली (उदा. वल्लरी) पहा cyme.
|