|
बहु- अनेक याअर्थी उपसर्ग p.adelphia बहुसंघीय, पॉलिअडेल्फिया कार्ल लिनियस यांच्या कृत्रिम वर्गीकरण पद्धतीतील एक वर्ग. यामध्ये त्यांनी फुलातील केसरदलांचे अनेक गट (झुबके) असणाऱ्या सर्व वनस्पतींचा समावेश केला होता. p. adelphous बहुसंघ केसरदलांचे अनेक संघ असणारे (केसरमंडल किंवा फूल) उदा. संत्र, एरंड इ. p. androus बहुकेसरित अनेक केसरदले असलेले (केसरमंडल, फूल) उदा. गुलाब, वाघाटी, कुंभा इ. p. andry बहुकेसरत्व अनेक केसरदले असण्याचा प्रकार (स्थिती). p. anthous बहुपुष्पी एकाच छदमंडलात अनेक फुले असलेले उदा. कुमूर, निशिगंध (Polyanthus tuberosa L.) p. arch बहुसूत्र आदिप्रकाष्ठांचे अनेक गट असलेला रंभ, उदा. सिलाजिनेला पहा stele p. carpellary बहुकिंज, बहुकिंजदली खुल्या किंवा जुळलेल्या अनेक किंजदलांचे (किंजमंडल) उदा. गुलाब, भेंडी, पिवळा चाफा, कमळ इ. p. carpic बहुफली जीवनात अनेकदा फुले व फळे निर्मिणारे उदा. आंबा p. carpous मुक्तकिंज, पृथक् अंडपी पहा apocarpous p. cephalous बहुस्तबक, बहुशीर्षक स्तबकासारखे अनेक फुलोरे असलेले, उदा. सहदेवी, ओसाडी इ. पहा capitulum p. chasium बहुशाख पहा pleiochasium p. cotyledonous बहुदलिकित अनेक दलिका असलेले (बी, वनस्पती) उदा. पाइन (देवद्वार, चीड) p. cyclic बहुचक्रीय पुष्पदलांची (संदले, प्रदले इ.) अनेक मंडले असलेले (फूल) उदा. गुलाब p. embryony बहुगर्भत्व, बहुभ्रुणता एका बीजकात किंवा बीजात अनेक गर्भ असण्याचा प्रकार, उदा. पाइन व इतर शंकुमंत वनस्पती, संत्र, लिंबू इ.
|