-
न. ( ल .) भाकर .
-
न. १ एक खेळणें ; चक्री ; भोंवरा . २ कडें ; मंडळ ; वर्तुलाकृति रस्ता किंवा जमीनीचा भाग ; डोंगराचा किंवा खडप्याचा वाटोळा किंवा पुढें आलेला भाग . ३ ( अश्वविद्या ) घोडा मंडलावर धरण्याची जागा . ४ - न . स्त्री . भोंवळ ; भोवंड ; घेरी . ५ चुन्याची घाणी , घाणा . ६ पित्तप्रकोपामुळें डोळयांपुढें उभें राहणारें चक्र किंवा मंडळ ; डोळयांपुढें काजवे चमकणें . ७ खळें ; तेजोवलय ; कडें ; परिवेष ; परिघि ( चंद्रसूर्य , देवादिक इ० कांच्या भोंवतीं असणारें ). ८ फेरी ; गरका ; वळसा ; हेलपाटा ; येरझारा . ( क्रि० घेणें ). ९ चाक . १० विष्णूचें सुदर्शन चक्र . ११ ( व . ) शेंडीचा घेरा . या वेळीं शेंडीला चक्कर ठेविलें . १२ तर्हेवाईक , चक्रम मनुष्य ; विचित्र , विक्षिप्त माणूस . काय चक्कर आहेस ? १३ कांहीं तरी क्षुल्लक काम . [ सं . चक्र ] ( वाप्र . ) ( एखाद्यावर ) चक्करफिरणें - १ ( सुदर्शन चक्रावरून प्रयोग ) ईश्वराच्या कृपाछत्राखालीं असणें . २ दु : खें , संकटें यांत गुरफटणें किंवा यांनीं घेरणें , वेष्टणें ; संकटांत सांपडणें .
-
०मारणें मारून येणें - फेरी , गरका , वळसा , हेलपाटा , येरझार घालून येणें ; जाणें येणें ; जाऊन परत येणें . किल्ल्यावरून चक्कर मारून परत तुझ्या महालाकडे येतो . - कोरकि २९ . दुकानाकडे चक्कर मारून ये . चक्करा वर धरणें - १ घोडा मंडलाकार फिरविणें . २ ( ल . ) कचाटींत , जरबेंत धरणें . चक्करघाड - स्त्री . ( विणकाम ) ( बे . ) ताण्यांतील दोरे खालींवर होऊन घोटा जाण्यास वाट मिळण्यासाठीं फणीस दोरीनें फणीच्या वरच्या भागास जोडलेली चक्राकृति वस्तु . [ सं . चक्र + घाट ]
-
ना./वि. खेप , फेरी , भ्रमण , येरझारा , वळसा , वारी , हेलपाटा ;
Site Search
Input language: