Dictionaries | References

हेलकावा

   
Script: Devanagari

हेलकावा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v दे.

हेलकावा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An undulation; a jolt; a pull.

हेलकावा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  हेलकावताना होणारी हालचाल   Ex. नाव रिकामी असल्याने तिला हेलकावे बसत होते

हेलकावा     

 पु. १ आंदोलन ; झोंका ; लाट ; मागें पुढें होण्याची क्रिया ( समुद्राच्या पाण्याची , झाडाची फांदी इ० ची ). २ माणूस जहाज इ० चें हालणें ; झुलणें ; झोका खाणें ( लाटा , वारा इ० नीं ). ( क्रि० बसणें ; खाणें ). ३ हिसका ; धक्का ; झोका ( क्रि० देणें ). ४ ( ल . ) ( अर्जदार इ० चा ) फुकट हेलपाटा ; वृथा येरझार . ( क्रि० देणें ). [ सं . हेला = क्रीडा , खेळ ] हेलकावणें - अक्रि . १ आंदोळणें ; हेंदकाळणें ; डोलणें ( लाट इ० नें ). २ लाटांच्या मार्‍यानें तारूं इ० नें खालींवर उशा खाणें ; लाटा खाणें ; झोंके खाणें . ३ इकडून तिकडे झुलणें ( पाळणा इ० नें ). ४ आचके बसणें ; हिसका खाणें ; मागेंपुढें होणें ; हबका सोसणें ( घोडेस्वार , उंटस्वार यांनीं - चालतांना ). ५ ( सामान्यतः ) झोंके खाणें . हेलकाविणें - सक्रि . १ हलविणें ; झोंके देणें ; डोलविणें ; हेलकावा देणें . २ ओढाताण करणें ; पुढेंमागें करणें . ३ हेलपाटा ; उगीच दवडणें . ४ धुडकाविणें ; तिरस्कारानें हांकलून लाविणें ; घालविणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP