|
न , होमांत टाकावयाचें ( तूप , भात इ० ) द्रव्य पदार्थ ; बली . [ सं . हविस ] हवित्रि - स्त्री . होमकुंड . हविष्य - न . १ हवन करावयास योग्य वस्तु ; हवि . २ व्रतादि दिवशी भक्षणीय असा शुद्ध पदार्थ ( गोधूम , गोदुग्ध इ० ). ३ ( ल . ) वरील पदार्थ खाण्याचें व्रत , नियम , बंधन . ४ ( उप . ) नेहमीची लोकाचाराविरुद्ध किंवा स्वैर वागणूक , वहिवाट , नेम , प्रघात , व्यसन . या गांवांत सर्व लोकांस रांडबाजी हे तर हविष्य आहे . घोडयावर बसणें हें त्यांचें हविष्य आहे . हविष्यान्न - पु . हवि ; हविष्य अर्थ १ पहा . २ तांदूळ , गहू इ० धान्य व तूप , दूध इ० हवनीय पदार्थ ३ हे पदार्थ खाऊन रहावयाचे एक व्रत . [ सं . हविष्य + अन्न ]
|