Dictionaries | References

शेत

   
Script: Devanagari

शेत     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  धान्य,गोटो जावं हेर पिकावळ रोवपाची जमीन   Ex. आमच्या गावांत खूब शेत आसा
HYPONYMY:
वांयगण भाताचें शेत पोरसूं पानमोळो
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmখেতিপথাৰ
bdफोथार
benক্ষেত
gujખેતર
hinखेत
kanಹೊಲ
kasکَھہہ
malവയല്‍
marशेत
mniꯂꯧꯕꯨꯛ
nepखेत
oriଖେତ
panਖੇਤ
sanकृषिः
tamவயல்
telపొలం
urdکھیت , اراضی , زمین , کاشت کی زمین
See : उबें पीक

शेत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
at the very time the profit is ready to be reaped.

शेत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A field, a cultivated piece of ground. A standing crop. Agriculture.

शेत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  धान्य वगैरे लावण्याची जागा   Ex. शेतकरी शेतात बी पेरत आहे
HYPONYMY:
पानमळा भातजमीन कोरडवाहू जमीन आखर
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जमीन वावर रान
Wordnet:
asmখেতিপথাৰ
bdफोथार
benক্ষেত
gujખેતર
hinखेत
kanಹೊಲ
kasکَھہہ
kokशेत
malവയല്‍
mniꯂꯧꯕꯨꯛ
nepखेत
oriଖେତ
panਖੇਤ
sanकृषिः
tamவயல்
telపొలం
urdکھیت , اراضی , زمین , کاشت کی زمین

शेत     

 न. १ धान्य वगैरे लावण्याची जागा ; क्षेत्र ; लागवड केलेली जमीन . २ पीक ; उगवलेले , पिकलेले उभें धान्य . ३ शेतकाम ; कृषिकर्म ; धान्य पिकविण्याचे काम ; शेती . ४ नवरात्रांत किंवा चैत्रांत रहू करतात तो ; भांडयांत रुजत घातलेले धान्य व त्याचे अंकुर . ५ ( ल .) उपजिविकेचे साधन ; धंदा ; व्यवसाय . पोटाची तजवीज . [ सं . क्षेत्र ; प्रा . छेत ] शेत उतरणे - कणसे चांगली बाहेर पडून भरणे ; कणसे , चांगली येणे . शेत घरांत ठेवणे , असणें , करणें - खंडाने न देतां शेताची मशागत स्वतः करणे . शेत तोडणे - कोवळ्या भाताच्या रोपावर रोग पडणे - कृषि २३६ . शेत सोसणे - भात रोप्याचे केसर पांढरे पडणे ; शेत सुकणे , वाळणे ; एक रोग . [ सं . शुष् ‍ ] भरल्या शेतांतून काढणें , भरल्या शेतांतून ढकलणें , भरल्या शेतांतून उठविणे - लाभ होण्याच्या ऐनवेळी काढून लावणें ; हातातोंडाशी आलेला घास काढून घेणे .
०आडगरा वि. पु. नाचणीची एकजात .
०एरंड  पु. एरंडीचे झाड ; सुरती एरंडीचे झाड ; सुरती एरंड ; मळा एरंड दुसरा मोगली एरंड , वईएरंड .
०करी  पु. १ शेतीवर निर्वाह करणारा ; शेतीची मेहनत करणारा ; कृषीवल . २ शेताचा मालक , धनी . ३ शेती ; खंडकरी ; शेतावर काम करणारा ; कर्दा ; कूळ .
०कापशी  स्त्री. शेतांत पेरावयाचे , उगवणारें कापशीचे झाड .
०काम  न. शेतीचे काम धंदा .
०कामी   काम्या - वि . शेतावर काम करणारा ; शेतकीच्या कामी येणारा , उपयोगी पडणारा ; कृषीवल .
०खप्या  पु. १ केवळ शेतकाम ज्याला माहित आहे इतर कांही विद्या नाही असा मनुष्य ; अडाणी , गांवठी मनुष्य ; गांवढा . २ शेतकाम करणारा परंतु ज्याचा वास्तविक धंदा शेतकीचा नव्हे , असा ब्राह्मण वगैरे मनुष्य .
०खेत  न. जमीनजुमला ; शेती ; वतनवाडी .
०गणा  पु. शेतजमीनीचा समुदाय ; लागवडीची जमीन .
०गहूं  पु. गव्हाची एक जात ; पाणी न देतां शेताच्या ओलीवर येणारा गहूं .
०गी  स्त्री. शेतकाम ; कृषिकर्म ; जमीनीची मशागत , लागवड वगैरे . वेठीचे उपद्रवामुळे रयत परागंदा होत्ये , शेतगी होत नाही . - वाडसमा ३ . २२४ .
०घर  न. शेतांतील घर ; शेतकामांसाठी शेतांत बांधलेली झोपडी वगैरे .
०जमीन  स्त्री. लागवडीखालील जमीन .
०पेढी  स्त्री. शेतकर्‍यास कर्ज देणारी सहकारी पतपेढी .
०पोत  न. १ सामान्यतः शेती ; शेतीखालील जमीन ; शेतीवाडी ; जमीनजुमला . २ शेतीची कामें ; कृषिकर्म . [ शेत द्वि . ]
०वाडी  स्त्री. शेतभात ; शेतीवाडी .
०भात   शेतीभाती - नस्त्री . शेती ; शेतजमीन ; शेतीवाडी ; सामान्यतः शेतीची जमीन व लागवडीची कामें यांस व्यापक संज्ञा .
०मळा  पु. शेती , बागायत वगैरे ; जिराईत व बागाईत शेती यांस सामान्य व्यापक संज्ञा .
०माल  पु. शेतीत पिकणारा माल .
०वड   शेताड - स्त्री . १ लागवडीची जमीन गांवासभोवतीची .
०वड   वडा - १ पु . एक फुलझाड ; दुधाणी , कुंभा पहा . २ एक झुडुप .
०वस्ती  स्त्री. १ ( हंगामात ) शेतावरील वास्तव्य , राहणे . २ शेतकरी लोकांची वस्ती , गांव , खेडे , गांवढे गांव .
०वळी  स्त्री. चांभार लोकांत मामाने बाशिंग बांधल्यावर वर शेजारच्या घरी जातो हा विधि .
०वाडी  स्त्री. शेती , लागवडीखालील जमीन , कुरणे , बागायत , आवार , वाडगे वगैरे शेतीसंबंधी जमीनीस व्यापक शब्द .
०वार   पत्रक वारी - नस्त्री . गांवांसंबंधी कुळकर्णी किंवा तलाठी यानें ठेवावयाचे सर्व जमीनीचे शेतांच्या अनुक्रमानें नोंदणीपत्रक , तक्ता .
०वाळूक  न. शेतांत होणारे एक काकडीसारखे वेलाचे फळ ; चिबूड .
०सनदी वि.  लष्करी अथवा इतर सरकारी कामाबद्दल पूर्वी सनदेसह शेत मिळत असे , तसे शेत धारण करून नोकरी करणारा .
०सनदी  पु. लष्करी नोकरीबद्दल शेताची सनद मिळालेला सैनिक . जेथे किल्ले आहेत तेथे किल्लेदार शेतसनदी शिपाई ठेवीत . - नि १०६१ .
शिपाई  पु. लष्करी नोकरीबद्दल शेताची सनद मिळालेला सैनिक . जेथे किल्ले आहेत तेथे किल्लेदार शेतसनदी शिपाई ठेवीत . - नि १०६१ .
०सरी  स्त्री. शेती , पिके वगैरेस सामान्य व्यापक संज्ञा . शेतकरी पिकली .
०सारा  पु. जमीनीवरील कर ; शेतीवरील कर , महसूल .
०हेत  न. जमीनजुमला ; शेतवाडी . शेतकी - स्त्री . १ शेतकाम ; शेतकर्‍याचा धंदा , व्यवसाय . २ पीक ; उभे पीक ; शेत . शेताड , शेताडी - शेतवड पहा . शेती , शेक - स्त्री . १ शेतकी ; शेतजमीन . २ शेतलागवडीसंबंधी कामें . शेती - पु . शेताचा मालक , धनी . - स्त्री . शेतजमीन ; शेतकी . शेती पाऊस - पु . पिकांना योग्य असा पाऊस . शेतीभाती - स्त्री . शेतवाडी , जमीन पहा . २ शेतीची कामें .

Related Words

शेत   काळीवर नाहीं शेत, पांढरीवर नाहीं माती (घर)   गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं   गाढवानें (शेत) खाल्‍ले पाप ना पुण्य   अघाडी शेत दुघाडी मळा   भरलें शेत   शेत उतरणें   भाताचें शेत   शेत करप   शेत नांगरणेचो पगार   घातीं आलेले शेत   शेत नांगरणेचो दिसवडो   राखील त्याचें शेत   शेत वाणीचें, गांव सोयर्‍याचें   अभ्यास करील त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी, खपेल त्याचें शेत व मारील त्याची तलवार   गवत गोंडाळ, शेत धोंडाळ, बायको तोंडाळ नसावी   गरवी शेत गौरी   उदीम करतां सोळा बारां, शेत करतां डोईवर भारा   आशेचे शेत शंभराला घेतलें काय, विकलें काय, सारखेंच   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   खपेल त्‍याचें शेत, जपेल त्‍याची लक्ष्मी व भारील त्‍याची तलवार   भातजमीन   शेत पिकत नाहीं, पेठ पिकते   मिरासीचें म्हूण शेत। नाहीं देत पीक उगें   शेत गेलें कटाळयानें, घर गेलें इटाळानें   राखील त्याचें घर, खणेल त्याचें शेत   खेत   मुंडाचें शेत   मुंड्यांचें शेत   शेत तोडणें   शेत सोसणें   बायको तोंडाळ, शेत दगडाळ   नवें शेत काढणें   शेत घरांत असणें   शेत घरांत करणें   शेत घरांत ठेवणें   नांगरणी   دانہِ خاہ   دھان کھیت   ଧାନ ଜମି   ਜੀਰੀ ਦਾ ਖੇਤ   ડાંગરનું ખેતર   धान खेत   धनी नाहीं शेतापाशीं, शेत नाशी   کَھنوٕنۍ   کَھہہ   جوتائی   চহোৱা মজুৰি   খেতিপথাৰ   हालेवनाय मुज्रा   ଖେତ   ਖੇਤ   ਜੁਤਾਈ   ખેડાઈ   ખેતર   ହଳମଜୁରୀ   வயல்   పొలం   వ్యసాయకూలి   ಹರಗುವ ಕೂಲಿ   ഉഴുവല്   വയല്‍   farm   धनी नाहीं, मेरें आणि शेत भरलें बेरें   धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें   शेत करतां हारकली अन् सारा देतां टराकली   शेत खाल्लं लोधडीनं अन् मार खाल्ला गधडीनं   शेत धोंडाळ, बायको तोंडाळ, गवत गोंडाळ   ধানের ক্ষেত   paddy   চাষ করা   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   देवाची गेली घांट, तर पुजार्‍याचें गेलें शेत (झ्यांट)   पोरीं संसार, अन्‌ गोन्हीं शेत, कधीं झालें आहे?   आबाद माव   कृषि करना   ক্ষেত   খেতি কৰা   ଚାଷ କରିବା   ਖੇਤੀ-ਕਰਨਾ   ખેતી કરવી   जुताई   फोथार   शेती करणे   உழுதல்   விவசாயம்செய்   వ్యవసాయముచేయు   ಬೇಸಾಯ ಮಾಡುವುದು   കൃഷി ചെയ്യുക   कृषिः   जोताइ   ಹೊಲ   कृष्   field channel   model farm   family farm   farm labour   farm manager   farm mortgage   farm servant   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP