Dictionaries | References

लटपट

   
Script: Devanagari

लटपट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also fidgetiness, restlessness, ceaseless stirring. 2 The agitation of consternation or terror; trembling and quaking in every joint; a fit of the tremors. Ex. वाघ पाहतांच त्याची लटपट झाली; हा पंडित बोलूं लागतांच त्या पंडिताची लटपट झाली. 3 Altercation, sharp bandying of angry words. v झड, लाग.
laṭapaṭa ad Imitative of the sound or expressive of the manner of the shaking of a slackly fixed post, stake, peg, nail &c. v हाल & कर.

लटपट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Lively motion; the agitation of terror. Altercation.

लटपट     

 स्त्री. 
चलाखी ; जलद हालचाल .
( पेंच घालून खेळतांना , मुलांचे खेळ रंगांत आले असतांना चिमण्या इ० पक्षी भांडताना , वादविवादांत वगैरे दिसून येणारी ). धडपड ; खळबळ .
घाई ; उतावीळपणा ; धांदल .
तळमळ ; अस्वस्थता .
मोठ्या भयाने होणारा थरकांप ; घाबरगुंडी . वाघ पाहतांच त्याची लटपट झाली .
हमरीतुमरी ; अरेतुरे ; बोलाचाली ; भांडण . ( क्रि० झडणे ; होणे ; लागणे ). काल देवळांत त्याची आमची लटपट झाली .
ओढाताण ; झटापट . प्रत्येक पदार्थांत तिन्ही गुणांची लटपट चाललेली असते . - गीर १५६ . ( निंदार्थी ) लबाडी ; फसवेगिरी . - क्रिवि . ढिला बसविलेला खांब , खुंटा , खुंटी , खिळा इ० कांच्या हलण्याच्या रीतीचे किंवा शब्दाचे अनुकरण होऊन . ( क्रि० हालणे ; करणे ). [ ध्व . ] लटपटणी - स्त्री . डगडगणे ; डकडकणे ; लटलट हालणे . लटपट पहा . [ लटपटणे ] लटपटणे - अक्रि .
ढिलेपणामुळे डगमगणे ; डकडकणे ; हालणे ( खांब , खुंटी , खिळा ).
फसणे ; फिसकटणे ; बिघडणे ; नासणे ; चुलींत किंवा रसातळास जाणे ; नष्ट होणे ( काम , जागा , अधिकार , मसलत , संपत्ति ). मामलतीचे छंदास पडला तेणे करुन पहिली सावकारी होती ती लटपटली .
निरुपयोगी , व्यर्थ म्हणून ) दूर , बाजूला फेंकला जाणे ; नापसंत , रद्द केला जाणे ; गाळला जाणे ; रद्द पडणे . पहिला कारभारी येतांच नवे कारभारी झाले होते ते लटपटले .
निस्तेज , फिके पडणे ; वजन न पडणे . त्याचे वक्तृत्वापुढे आमची सार्‍यांची वक्तृत्वे लटपटली .
गोंधळणे ; घाबरणे . [ लटपट ] लटपटपंची - उद्गा . ( पोपट , डोल ) पोपटास म्हणायला शिकवितात तो शब्द . - स्त्री .
( ल . ) घोटाळा ; गोंधळ .
फसविण्याच्या उद्देशाने केलेले धरसोडीचे , गोंधळविणारे भाषण . खर्‍या मार्मिक श्रोत्यांस केवळ लटपट केल्याने लेशमात्रही द्रव येणार नाही . - नि .
लबाडी ; फसवेगिरी .
बढाई ; शेखीच्या गोष्टी ( अंगी तादृश सामर्थ्य नसतां केलेल्या ). एवढे डौलाने कशाला बोलतां , तुमची लटपटपंची चालायाची नाही . [ लटपटणे + पंची + पोपट ] लटपटीत - वि .
आवाज करुन डगमगणारा ; डगडगणारा , खिळखिळा ( ढिला बसलेला खांब , खुंटा , खुंटी इ० ).
( ल . ) डळमळीत ; अस्थिर ; अनिश्चित ; चंचल ( अधिकार , नेमणूक , काममसलत , भाषण , वर्तन ). [ लटपट ] लटपट्या - वि .
चपल ; चलाख ; झटपट्या ( मनुष्य ).
धांदरा ; गडबड्या .
पुढे पुढे नाचणारा ; लडबड्या ; लुडबुड्या
लबाडी करणारा ; फसव्या . [ लटपट ] लटपटी - स्त्री . लटपट पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP