|
स्त्री. रेषा ; ओळ . कांही आकृतीची मर्यादा . चेहरा ; हजामत ; दाढी करुन कपाळावरील केंस न्हाव्याकडून काढून महिरपीच्या आकाराची आकृति हौशी लोक कपाळावर करवितांत ती . ( क्रि० धरणे ). सरकारी किंवा इतर कामाच्या कागदावर निरनिराळ्या लांबीच्या व प्रकारच्या व निरनिराळे अर्थ असलेल्या रेघा मारतात . त्यांची नावेः - किंदरी , किताबती , खडे , दुरकानी , तिरकानी , दफाते , हिकायती इ० ( क्रि० ओढणे , काढणे ; फाडणे ). [ सं . रेषा ] ०ओढून किंवा काढून - एखाद्याच्या वर्तनाला शिस्त लावून देणे ; त्याला वर्तनाचे नियम घालून देणे . देणे किंवा काढून - एखाद्याच्या वर्तनाला शिस्त लावून देणे ; त्याला वर्तनाचे नियम घालून देणे . ०धरणे दाढी करुन कपाळावरील केंस काढून महिरपीप्रमाणे आकार करणे . ०मारणे हद्द ठरविणे ; ओळ काढणे . रेघेरुपास आणणे येणे चढणे उत्कर्षाच्या स्थितीस पोंचविणे , पोंचणे ; वैभवशाली करणे ; होणे ; नांवारुपाला आणणे , येणे ; ऊर्जितावस्थेला आणणे , येणे . काढल्या रेघेने रेघे चालणे वागणे करणे ठरवून दिल्याप्रमाणे ; सांगितल्याप्रमाणे ; नेमल्याप्रमाणे वागणे ; आंखून दिलेल्या मार्गाने चालणे . रेघनरेघ क्रिवि . पूर्ण ; खडानखडा ; बारीकसारीकसुद्धां . रेघरुप न . पदार्थांची घटना किंवा आकारमान . पदार्थाचे स्वरुप . उत्कर्षाची स्थिति ; भरभराट ; पूर्णपणा . रेघेरुपास आणणे पहा . रेघटी , रेघोटी - स्त्री . ( वांकडीतिकडी ) रेघ ; रेषा ; ओळ . रेघाटणे , रेघाळणे - सक्रि . रेखाटणे पहा .
|