|
पु. पु. श्रेष्ठ ; नाशीक प्रांतांत भिल्लांच्या जातीच्या पाटलाला , पुण्याकडील सुताराला मेहतर म्हणतात . जातीचा मुख्य ; म्होरक्या ; पुढारी . - गांगा २९ . भंगी ; झाडूवाला . खेडेगांवच्या वंशपरंपरागत वतनदार महाराच्या बद्दल योजावयाचा शब्द . ह्यावरुन सर्वसाधारणपणें चांभार व महार याच्याबद्दल योजावयाचा शब्द . तसेंच अशा तर्हेच्या शब्दांना प्रत्ययवजा जोडून उपयोग . जसे :- हिरम्हेतर ; चांगम्हेतर . भंगी . घडा ; रांजण . [ फा . मिहतर ] सामाशब्द - मेहेत्रेपण , पणा - नपु . जातीचा पुढारीपणा ; एक हक्क ; हक्काची बाब . नेवासें परगण्यांतील न्हाव्यांमधील मेहेतरपणाचा कज्जा न्हाव्यांनीं पाटीलकुळकर्णींनिंशीं हुजुरास येऊन तोडून घेतला . - पेशवेकालीन महाराष्ट्र पृ . ४८३ . गवंडी , सुतार , लोहार , साळी , कोष्टी , तेली तांबोळी , माळी , चांभार यांच्यांतील नायकाबद्दल किंवा मुख्याबदल मोठेपणानें योजावयाचा शब्द . पाटील , कुळकर्णी , चौघुला इ० वतनदार लोकांच्याबद्दल प्रतिष्ठितपणें योजावयाचा शब्द . [ सं . महत्तर ] ०की स्त्री. म्हेतराचा उद्योग किंवा कर्तव्य ; ग्रामादिसंबंधीं एक वतनदारी . म्हेतराणी , म्हेत्राणी स्त्री . भंगीण किंवा झाडूवाली बाई . म्हेतराची स्त्री ( वतनदार महार किंवा चांभार याची ) चांभार जातीची स्त्री . म्हेतर्या - पु . वतनदार महाराबद्दल श्रेष्ठत्वाचा शब्द ; कांहीं कारागीर लोकांतील नायकाबद्दल योजावयाचा शब्द . तसेंच जातींतील मुख्य इसमाबद्दल योजावयाचा शब्द . म्हेतर अर्थ २ , ३ पहा . [ म्हेतर ]
|