|
क्रि.वि. गतकालीं ; पूर्वी ; अगोदर . पाठीकडे ; पार्श्वभागीं . तो माझ्या मागें उभा होता . नंतर ; पश्चात . माझ्या मागें मुलांचें कसें होईल याची मला काळजी वाटते . ( ल . ) वर अवलंबून . माझ्या मागें हजार कामें आहेत . [ सं . मार्ग = शोधणें ] म्ह० पुढें पाठ मागें सपाट . मागें एक पुढें एक - पुढें एक बोलणें आणि मागें विरुद्ध बोलणें , करणें , बोलणें व कृति यांत फरक असणें . मागें येक पुढें येक । ऐसा कदापि नाहीं दंडक । - दा १९ ४ . १८ . ०घेणें फिरणें सरणें होणें हटणें - उलट खाणें ; परावृत्त होणें ; सोडून देणें . मी हें काम पथकरलें तें पथकरलें , आतां मी मागें घ्यावयाचा नाहीं . ०टाकणें ( पैसा इ० ) शिल्लक ठेवणें . भीतिग्रस्तास पाठीशीं घालणें . मला द्यावें जीवदान टाकावें मागें । - ऐपो १५९ . ०पडणें खर्च न होतां शिलकेस राहणें ; गांठीं पडणें ( द्रव्य ). काटकसरीनें खर्च करा म्हणजे चार पैसे मागें पडतील . साफ बरा होणें ; निखालस जाणें ( दुखणें , त्रास ). माझी पोटदुखी अगदीं मागें पडली . आठवणींतून आणें . आमच्या बरोबर फिरावयास या , म्हणजे तुमच्या आईच्या मरणाचें दुःख मागें पडेल . रद्द होणें ; मोडणें . हा नियम आतां मागें पडला . प्रगति कमी होणें . रामा महिनाभर आजारी होता म्हणून मागें पडला . फिक्के पडणें ; महत्त्व कमी होणें . मिरजकरबुवांच्या कथा पुण्यास सुरु होतांच इतर सर्व हरिदास मागें पडले . ०पाडणें ( मिळकत , वेतन इ० कांतून ) शिलकेस टाकणें ; संग्रही टाकणें . ०राहणें पिछाडीस असणें ; लोकांपुढें , प्रसिद्धीस न येणें . ०लागणें ( एखाद्याचा ) पिच्छा पुरविणें . तगादा करणें . ०पाय वि. पिशाच्चयोनि . तुका म्हणे मागें पाय । तया जाय स्थळाशीं । - तुगा ६५८ . मागें पुढें क्रिवि . आजूबाजूस मागेंपुढें पाहून चाल , दांडग्यासारखा चालूं नको . दोन्ही दिशांकडे , गोष्टीकडे ; दोन्हीपक्षी . ( शब्दशः व ल . ) मागेंपुढें पाहून काय करणें तें कर . लवकर किंवा उशिरां ; आगेंमागें ; केंव्हांना केव्हां . तुम्ही असें करतां परंतु मागेंपुढें जाचील . अस्ताव्यस्तपणें ; व्युत्क्रमानें ( पडलेल्या वस्तू ; बोललेल्या , केलेल्या गोष्टी ). हा ग्रंथ मागेंपुढें झाला आहे , नीट कर . कांकूं , टंगळमंगळ करुन . हा मागेंपुढें करुं लागला . केव्हां तरी ; कधी तरी ; आणखी एखांद्या वेळेस ; पुढच्या किंवा मागच्या बाजूस . ०करणें माघार घेऊं लागणें ; कांकू करणें . ०कोणी - वडील माणूस किंवा संतति नसणें ; आईबाप , बायकापोरें याशिवाय असणें . *** पाहणें - मुळींच न कचरणें . मला चोर भेटले तेव्हां मी मागेंपुढें न पाहतां त्यांच्या अंगावर तुटून पडलों . नसणें - वडील माणूस किंवा संतति नसणें ; आईबाप , बायकापोरें याशिवाय असणें . *** पाहणें - मुळींच न कचरणें . मला चोर भेटले तेव्हां मी मागेंपुढें न पाहतां त्यांच्या अंगावर तुटून पडलों . ०पाहून - दूरवरचा विचार करुन , शहाणपणानें चालणें . मागमोरा , मागमोरा मोहरा - वि . पाठमोरा . [ दे . ] मागोमाग क्रिवि . लागलीच ; पाठोपाठ . [ मार्गे द्वि . ] मागोती , मागौता , मागौतिआं , माघौतीं - क्रिवि . वागणें - दूरवरचा विचार करुन , शहाणपणानें चालणें . मागमोरा , मागमोरा मोहरा - वि . पाठमोरा . [ दे . ] मागोमाग क्रिवि . लागलीच ; पाठोपाठ . [ मार्गे द्वि . ] मागोती , मागौता , मागौतिआं , माघौतीं - क्रिवि . पुन्हां . तो दैववशें मागौता । जळेंचि लाहे । - ऋ ६२ . मागौतिआं निगलिआ । पवनवेगें । - शिशु ९०८ . माघौतीं न यों सर्वथा । - भाए ३२३ . माघारी ; परत . स्वयंवरा आली उर्वशी । ते मागौती पाठवीलि साधुसीं । - शिशु २०२ [ मागें ]
|