Dictionaries | References

मरण ज्याठायीं, चालून जाई आपल्या पायीं

   
Script: Devanagari

मरण ज्याठायीं, चालून जाई आपल्या पायीं     

मनुष्याचा जेथें मृत्यू असेल तेथें मनुष्य आपण होऊन जातो. मनुष्य मृत्यूच्याजागीं आपल्या पायांनीं चालून जातो, असा समज. [ एका मनुष्यास मरणाचें फार भय वाटत असे. त्यानें वैद्यांस विचारलें कीं, मरण कशापासून येतें. त्यांनीं सांगितलें कीं पाण्यापासून रोग होतात व रोगापासून मृत्यु येतो. तेव्हां त्या मनुष्यानें गांवांतील पाणी प्यावयाचें सोडून दिलें व तो एका ओढयावर जाऊन पिऊं लागला. एके दिवशीं ओढयावर जात असतां त्यास वाटेंत मृत्यु भेटला
तेव्हां त्यानें विचारलें कीं, माझा मृत्यु कोठें होणार आहे ? मृत्यूनें सांगितलें कीं, ज्या जागीं तूं उभा आहेस त्याच जागीं तुझा मृत्यु आहे. तेव्हां त्या मनुष्यानें तो गांव सोडून दिला व दुसर्‍या गांवीं तो राहावयास गेला. तेथें राहात असतांना एके दिवशीं तो घोडयावर बसून फिरावयास निघाला असतां घोडा उधळून तो नेमका त्याच जागीं येऊन घोडयावरुन खालीं पडला व मरण पावला.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP