Dictionaries | References

भुलणें

   
Script: Devanagari

भुलणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   
   To forget.

भुलणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   become infatuated with.
 v t   and
 v i   forget.

भुलणें

 अ.क्रि.  
   स्वतांस विसरणें ; वेडा होणें ; बुद्धि गमावणें ; मोहित होणें ; लुब्ध होणें .
   बेभान होणें ( दारु , संपत्ति , मान , प्रीति इ० कांनीं ). - उक्रि . विसरणें . जयाच्या आद्यंतीं भुलिजे । आपुली वाट । - ज्ञा १८ . ८०८ . [ सं . भ्रश ; प्रा . भुल्लइ ; हिं . भुलना ] भुलथाप , भूलथाप , भुलताप , भूलताप - स्त्री .
   भरंवसा वाटण्याकरितां मारलेली गप्प . ( क्रि० देणें ).
   फसवणूक . भुलवण - स्त्री .
   ( राजा . ) भुलविण्याची , मोहविण्याची क्रिया .
   भुरळ ; मोहित स्थिति ( मंत्र , खुशामत इ० कांनीं ). ( क्रि० घालणें , पडणें ).
   भूलथाप . भुलवणा - वि . मोहित करणारा ; भुलविणारा . नेणता गोवळीं गोवळालाघवी अबळा भुलवणा । - तुगा ७३७ . भुलवणी - स्त्री . भूल . भुलवण पहा . भुलविणें , भुलवणें - सक्रि .
   विसरण्यास लावणें .
   चुकविणें ; घुलकावणी दाखविणें . जो सन्मार्गु भुलवी । - ज्ञा १८ . १०५६ .
   वेड लावणें ; मोहविणें ; छकविणें ; भूल घालणें . जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां । - ज्ञा २ . ३१२ . ( गो . ) भुलसांवचें . भुलसावणी - स्त्री . ( गो . ) भूल . भुलाई , भुलावणी - स्त्री .
   फसवणूक ; हुलकावणी . भुलाई - स्त्री . ( व . ) नटवी स्त्री . भुलाभटका - वि .
   बेबंद आणि भटक्या .
   गोंधळल्यानें बहकणारा . [ भुलणें + भटकणें ] भुली - स्त्री . ( काव्य ) गुंगी ; भुरळ ; मोह ; भ्रम ; विस्मरणशीलता . रायासी अंतरीं भुली पडली । देखोनियां तियेतें । - कथा १ . ८ . १५२ . भुलीचें झाड - न . ( ल . ) मोह भ्रम उत्पन्न करणारें भूत ; भुताची बाधा . ( क्रि० भेटणें ). भुलोबा - पु . शेतांत पांखरांसाठीं उभें केलेलें बुजगावणें . भुल्यो - उद्गा . खेळांतील तात्पुरती तहकुबी ; थुश्शो . भुल्लसचें , भुल्लुसचें - अक्रि . ( गो . ) भ्रंश पावणें ; वेड लागणें . [ भूल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP