Dictionaries | References

चंद्री

   
Script: Devanagari
See also:  चंद्रया

चंद्री     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

चंद्री     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Fixedness and glaze of the eyeballs (in intoxication or in death; also in earnest attention or thought.)

चंद्री     

वि.  कपाळावर पांढरा ठिपका असणारी ( गाय , बैल , म्हैस , रेडा इ० ) [ चंद्र ]
 स्त्री. चंदेरी ; पितळी वाटी [ चंदेरी ]
 स्त्री. १ तंद्री ; टक ; एकसारखी नजर ; एक लय ; एकाग्रता ; ध्यानावस्था ( प्राणोत्क्रमणसमयीं किंवा मद्याच्या धुंदींत ). चंद्री लागे होय विरूप । जठराग्निहि विझे । - स्वदि १३ . ५ . ३१ . २ मनाची एकाग्रता झाली असतां , एकीकडेच सारखें लक्ष लागलें असतां बुबुळांना जी निश्चलता येते ती . ( क्रि० लागणें ). येकांच्या बैसल्या अमृतकळा । येकांस चंद्री लागली डोळां । - दा ३ . ५ . ४ . दृष्टीं देखियेला गजानें तो वैरी । तेणें नेत्रीं चंद्री लागलीसे । ३ निश्चल न बसण्याजोगी स्थिति ; दिवसभर मेल्याला चंद्री लागली आहे . ४ अतिशय उत्कंठा ; चिंता . परी संततीवीण दिसे दरिद्री । म्हणोनी लागली मनीं चंद्री । - मुसभा ६ . ८ ( एखाद्याची ) चंद्री भुलणें , गुंग होणें - ( हर्ष , भय , आश्चर्य यांच्या योगानें ) बावरणें ; घाबरणें ; गडबडणें ; बेहोष होणें ; बेभान , गुंग होणे . लोकांचीं घरें भडभडा चेत घेताहेत ... पाहशील तर चंद्री गुंग होईल . - बाळ २ . १०४ . [ सं . चंद्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP