Dictionaries | References

बिनी

   
Script: Devanagari
See also:  बिंदावनी , बिंदी

बिनी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 2 The nose or fore part of a turban. 3 The rim or projecting edge of the boarding which supports the wall over a doorway or window-aperture. 4 The slip which, laid along one leaf or fold of a door, overlaps the other leaf, and covers the line of juncture. 5 A marginal summary or a brief heading. बिनीचा belonging to the van or front, i.e. chief, leading, arch, of the first rate--a soldier, musician, thief, blackguard, scamp.

बिनी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The van; the forepart of a turban.

बिनी

  स्त्री. 
  स्त्री. 
   सैन्याची आघाडी ; म्होरप ; बिन्दी . धायगुडे थोरात पांढरे लगड होते बिनीला । - ऐपो १९१ .
   ( कों . ) कपाळपट्टी .
   पागोट्याचें केळें ; कपाळावर येणारा पुढचा भाग .
   दारास दिलेली वरची आडवी पट्टी .
   दार , खिडकी इ० च्या चौकटीचा वरचा भाग .
   दाराची मधली उभी पट्टी .
   दार , खिडकी इ० च्या दोन फळ्यांतील फट बुजविण्याकरितां एकीस जी उभी पट्टी टोकतात ती .
   समासांत लिहिलेला सारांश किंवा प्रकरणाचा लहान मथळा . बिना पहा .
   नाकावरची टोपी ; नासात्राण . टोपास बिन्या वगैरे बावन्न बिरदे सिद्ध होऊन गोटाबाहेर निघाले . - भाब ५६ . [ फा . बीनी = नाक ] वर असणें - सर्वांच्या पुढें असणें . बिनीचा - वि .
   पुढचा ; अघाडीच्या भागाचा .
   ( ल . ) मुख्य ; अग्रगण्य ; पहिल्या प्रतीचा ( सैनिक , गवई , चोर , सोदा , भामटा ).
०दार वि.  ( नाक असलेलें ) वळीच्या खालच्या बाजूस पुढें आलेला भाग असलेलें ; बिनी किंवा केळें असलेलें ( पागोटें ). [ फा . ]
०पट्टी  स्त्री. नासात्राण ; घोणात्राण . - राव्यको ४ . १६ .
०वाला  पु. 
   बिनीतींल शिपाई , इसम .
   सैन्याच्या हालचाली व तळ देण्यासंबंधानें मराठ्यांच्या सैन्याच्या आघाडीवरील अधिकारी . ( इं . ) क्वार्टरमास्टर - जनरल .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP