Dictionaries | References

बिजवराची बायको, तिजवराची चोळी, नित्य लुगडें फाडी तिचें कोण काय करी?

   
Script: Devanagari

बिजवराची बायको, तिजवराची चोळी, नित्य लुगडें फाडी तिचें कोण काय करी?     

बिजवर आपल्या बायकोस फार जपतो व तिला कपड्यांची वाण पडूं देत नाहीं त्यामुळें तिला लुगडीं चोळया किती पाहिजे तितक्या पुरवूं शकतो
त्याच्याहिपेक्षां तिजवर आपल्या बायकोचे लाड पुरवितो. पण ज्या बायकोला रोज नवें लुगडें लागूं लागलें तिला कोण पुरवूं शकेल ? प्रत्येकाच्या प्रेमास किंवा सहनशीलतेस कांहीं तरी मर्यादा असते तिच्या पलीकडे गेल्यास कोणीहि सहन करीत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP