Dictionaries | References

तलब

   
Script: Devanagari
See also:  तलफ , तवाणी , तवानी

तलब     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : खोज, इच्छा, अभिमंत्रण, वेतन

तलब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Pay, wages, salary. 2 Desire after; uneasy sense of want of. 3 An ill-habit: also evil-addictedness. 4 A demand from Government or other creditor upon the debtor. 5 Summoning; a summons or subpœna. 6 The fee of a Peon serving a summons or executing a dunning for the revenue. 7 Summoning or requiring the attendance of gen. Ex. देखोनिया राजा संतोष पावला ॥ म्हणे व्यर्थ त्याला त0 केली ॥.

तलब     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Wages. An ill-habit. Desire after. Summoning.

तलब     

 स्त्री. १ वाईट व्यसन ; खोड ; चटक ; चट . २ व्यसनी मनुष्यास व्यसनाच्या पदार्थाच्या सेवनाची होणारी तीव्र इच्छा , हुक्की . ३ पगार ; तनखा ; मजुरी ; मुशाहिरा . तुंबलेला पगार ४ सावकाराने , सरकारने कुळाकडे केकेली पैशाची , वसुलाची मागणी , तगादा . अविंदाचे राज्य बेदरी असतां । कागद पाहतां तलब केली । - तुगा ४४ . ३६ . ५ सरकारी बोलावणे ; हज्जर राहण्याबद्दलचा हुकूम ; ( इं . ) समन्स . बोलाविले तै करोनि तलब । - दावि २०२ . हे जाणून त्यास तलब करुन हुजूर आणिला . - चित्रगुप्त ७८ . ६ समन्स बजावणार्‍या , वसुलाचा तगादा करणार्‍या शिपायाचा रोजमुरा , मजुरी . ७ ( सामा . ) बोलावण्याची क्रिया ; आमंत्रण ; बोलावणे . देखोनियां राजा संतोष पावला । म्हणे व्यर्थ त्याला तलब केली । तलफ पहा . ८ वरांत ; मागणी . त्यास आपली तलब रुपये एक हजार . - वाडबाबा १४१ . [ अर . तलब ] सामाशब्द -
०तनखा   तन्खा स्त्री . पगारखर्ची . पांचशे गोर्‍यांची तलब तनखा वरचेवर तुम्ही पाठवीत जावी . - दिमरा २ . १ . ६ .
०दार वि.  १ व्यसनाच्या पदार्थाची तलब ज्यास येते तो . २ पगारदार . ३ पैशाची , वसुलाची मागणी , तगादा करणारा ; ( इं . ) बेलिफ . ४ चौकशी करणारा . तलबान , तल्बाना पु . १ वसुलाचा तगादा करणार्‍या सरकारी शिपायास , बेलिफास कुळाने द्यावयाचा भत्ता . रोजमुरा ; तगाद्याची दस्तुरी ; ( इं . ) प्रोसेस फी . नजराणा व तलबाना वगैरे कुलबाब पाहिजे . - वाडबाबा १ . ४९ . २ ( सामा . ) रोजमुरा ; पगार ; मुशाहिरा . सोळा रोज प्रत्यह तल्बाना गाडदी यांस द्यावा लागतो . - ख १ . ४४४ . [ फा . तल्बाना ] तलबी वि . व्यसनी ; तलफी पहा . [ तलब ]

तलब     

तलफ(ब) चढणें
पगार तुंबणें
पगाराची बाकी राहणें. ‘त्‍या समयी आरबांची तलफ चढली होती. ती सरकारनें तलफ दिली.’-पेब ११७.

तलब     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : वेतन, मासिक वेतन

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP