|
पुन . १ देशावर उत्तरभागांत सह्याद्रि घाटाच्या रांगेने असलेला जंगली , डोंगराळ व चढणीचा प्रदेश . ( ज्याप्रमाणे सह्याद्रीच्या दक्षिण भागात मावळ त्याचप्रमाणे उत्तरभागांत डांग प्रदेश आहे . हा नाशिक व सुरत जिल्ह्यात मोडतो . ) २ ( को . ) रस्त्याचा , जमिनीचा , चढता भाग ; चढण . ३ सुळाजवळची पर्वताची एक सारखी चढण . ४ टेकडीची चढण व उतरण . ५ उंचवटा , लहानशी टेकडी ; टेकाड . उंच - सखल , खाचखळगे असलेला भाग . तिथे न खेळति डांगे चिखल वोहळाचिये । - भाए ६९१ . ६ ( को . ) खिंडीत , अथवा अरुंद दरीत असलेला झाडीचा प्रदेश . ( सामा . ) दाट झाडी . दिव्यद्रुमांची डांगे दाटे । - मुआदि ४ . १०८ . ७ टेकडीचे शिखर , टोंक . ८ ( माळवी ) जंगल . भोवताली झाडीची डांग भारी होती . - भाब ३५ . - वि . दांडगा ; रानटी ; दांड ; उर्मट ; क्रूर . कैसे सिकवावे त्या डांगा । हित आढळेना अंगा । [ दे . प्रा . डुंगर ; हिं . दांग . तुल० इं . डाँगा = दरी , खोरे ( हा शब्द दक्षिण आफ्रिकन भाषेतून इंग्रजीत आला . ) ] न. १ डोंगराळ मुलुख , डंगा पहा . २ डोंगराळ प्रांतातील झाडीचा प्रदेश ; निबिड अरण्य . [ प्रा . डाग = काठी ? ] स्त्री. १ केळीचे सबंध पान . २ ( कळकाची ) आंकडी ; मेढा , बुंध्यास वांकण आसणारा वेळू ( हाती धरण्याच्या उपयोगी ); कळकाच्या मूळापासून फुटलेला बांकदार कोंब ; अशा आंकडीदार बांबूचा एक भाग . ( डांग्या खोकल्यावर उगाळून देतात . ) ३ एक प्रकारचे गवत ; तृण . ४ पोफळीच्या बागेतील चार वाफ्यांचा एक भाग . ५ कळकाची दोन उभ्या दांडक्यांची चौकट ; यावर कोष्टी आपली फळी तयार करितात . ६ ( काही प्रांतात ) विणकामातील जुंपणी . जुंपणी ( - न . ) अर्थ ३ पहा . ७ टांग , ढांग . ( क्रि० टाकणे ) ८ लांब काठी ; दंडा . एरव्ही दोरिचिया उरगा । डांगा मेळविता पै गा । - ज्ञा १५ . २५१ . डांगा यष्टिका भिंडिमाळी । - मुआदि ३१ . ६० . ९ ( व ) फांदी ; डहाळी . विचित्रां डांगां झेलिती करी । - दावा ७० . फडा . निवडुंगाचे डांग - खरादे १११ . [ जुका डंके = काठी ; दे . प्रा . डंगा = काठी ; हिं . डांग ] पु. दरख . अधिकार ; पद ; सत्ता . ' परंतु पाटिलकीचा डांग त्यांजकडे चालत नव्हता .' - रा १६ . ४ . (?)
|