Dictionaries | References

गरीबाच्या संगतीनें जेवावयास जाणें, श्रीमंताच्या संगतीनें बघावयास जाणें

   
Script: Devanagari

गरीबाच्या संगतीनें जेवावयास जाणें, श्रीमंताच्या संगतीनें बघावयास जाणें     

गरीबाच्या बरोबर जर जेवावयास गेले तर तेथे संकोच न बाळगतां पोटभर खातां येते. श्रीमंत लोक जर कोठे जेवावयास गेले तर ते मोठ्या शिष्‍टपणानें नाममात्र खाऊन उठतात (मग घरी यथेच्छ जेवतात, किंवा घरून जेवूनच जातात.) तेव्हां पोटभर जेवावयाचें असेल तर गरीबाबरोबर जाणें चांगले. उलट एखादा समारंभ वगैरे पाहावयाचा असेल तर श्रीमंतास पुढे व ऐसपैस जागा मिळते व त्‍या ठिकाणाहून सर्व समारंभ चांगला दिसतो. पण गरीबास एखाद्या कोपर्‍यात जागा मिळते व तेथून काहीहि दिसत नाही. याकरितां नुसती शोभा वगैरे पाहावयाची असेल तर श्रीमंताबरोबर जाणें चांगले. मागे पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP