|
न. १ दूध . नीरक्षीरालिंगनरूपी स्नान तुला तें घालोनि । - सौभद्र . २ पाणी . ३ झाडांचा पांडरा चीक , रस . ४ - स्त्री . खीर . ५ क्षीरसागर . [ सं . ] ०कीट पु. नासलेल्या दुधांतील कीड . ०नीरन्याय पु. एकांत एक पूर्णपणें मिसळून जाणें ( दूधांत नीर = पाणी जसें एकरूप होतें तसें ) पूर्ण विलीनता . ०नीर , नीर विवेक - पु . हंस पक्षी जसा दूधपाण्याच्या मिश्रणांतून दूध निराळें काढतो तसें खर्याखोटयाच्या मिश्रणांतून खरें निवडून काढणें ; चांगलें - वाईटांतून चांगलें शोधणें ; निवड . विभाग , नीर विवेक - पु . हंस पक्षी जसा दूधपाण्याच्या मिश्रणांतून दूध निराळें काढतो तसें खर्याखोटयाच्या मिश्रणांतून खरें निवडून काढणें ; चांगलें - वाईटांतून चांगलें शोधणें ; निवड . ०पथ पु. आकाशगंगा . ( इं . ) मिल्की वे . क्षीरपथाचें अवलोकन ज्यानें एकवार केलें आहे तो या विश्वांतील कोणत्याही गोष्टीचा अंत आपणास स्पष्टपणें दिसून आला आहे , असें म्हणण्यास धजणार नाहीं . - आगर . ०वृक्ष पु. ज्यांतून दुधासारखा चीक निघतो असें झाड ( वड , रुई , चाफा , उंबर , शेर इ० ). ०सागर सिंधु समुद्र अब्धि अर्णव - पु . दुधाचा समुद्र ( पौराणिक ). सप्तसमुद्र पहा . क्षीरसिंधु परिसरीं । - ज्ञा १८ . १७५१ . नातरी क्षींरसमुद्रु । - ज्ञा १७ . २२६ . परि क्षीरार्णवी कल्लोळा । - ज्ञा ११ . ५३५ . ०स्फटिक पु. गोमेद रत्न . क्षीरापती - पु . विष्णुदेव . - शर . क्षीराब्धिकन्या , तनया - स्त्री . लक्ष्मी देवी . क्षीराब्धि , जामात - पु . विष्णु . क्षीरोदक - न . उंची , रेशमी पातळ ( बायकांचें ). शेले , शालू , साडया क्षीरोदक लांब रुंद पाटावें । - मोसभा ५ . ८३ . क्षीरोदक पाटोळा - पु . क्षीरोदक पहा .
|