Dictionaries | References त त्वक Script: Devanagari Meaning Related Words त्वक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. शरीरावरील चामडी ; कातडी ; ( झाडाची ) साल ; ( फळाचे ) सालपट ; त्वचा ( समासांत ) त्वगिंद्रिय - त्वक्क्षीर - त्वगंकुर - त्वक्पत्र इ० [ सं . ]०पक्ष वि. किड्यांतील एक वर्ग . या वर्गातील किड्यास त्वचेचे बनलेले चार पक्ष असतात ; ते पातळ असून त्यावर शिरा असतात ; मध वगैरे द्रव शोषण करण्याजोगे तोंड असते व दाढा चावण्याजोग्या असतात . - प्राणिमो ११५ . [ सं . त्वक + पक्ष = पंख ]०पापुद्रा पु. शेंवड्याच्या त्वकएशींतून स्त्रवणार्या पदार्थाचे शरीराभोवती तयार होणारे एक अखंड पटल ; ( इ . ) क्युटिकल . - ज्ञाको क १९० . [ त्वक + पापुद्रा ]०प्रत्यक्ष न. स्पर्शाने होणारे ज्ञान . [ सं . त्वक + प्रत्यक्ष = ज्ञान ]०शास्त्र न. त्वचेच्या रचनेचा व रोगांचा विचार करणारे शास्त्र ; ( इं ) डरमेटॉलॉजी .०शून्यवात पु. स्पर्शज्ञान नाहीसे करणारा वातविकार . [ सं . त्वक + शून्य = + वात ]०क्षीरा स्त्री. तवकीर . [ सं . त्वक + क्षीर = दूध ] त्वगामय , त्वग्रोग पु . खरुज , शिबे इ० ; त्वचेला होणारा रोग ; कोरडी खपली . [ सं . त्वक + आमय = रोग ] त्वगिंद्रीय न . स्पर्शज्ञान करुन देणारे ज्ञानेंद्रिय ; स्पर्शेंद्रिय . [ त्वक + इंद्रिय ] त्वग्रोग पु . त्वचेसंबंधी रोग ; त्वगामय पहा . [ त्वक + रोग ] त्वगव्रण पु . त्वचेला झालेला व्रण , जखम , फोड इ० याच्या उलट मांसव्रण , अस्थिव्रण . [ सं . त्वक + व्रण = जखम , फोड . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP