Dictionaries | References

एकल्याची एक वाट

   
Script: Devanagari

एकल्याची एक वाट     

१. एकटा मनुष्य असला म्हणजे तो एकमार्गी असतो. त्याला लागाबांध काही नसल्यामुळे तो स्वतःला वाटेल तसे वागूं शकतो. इतर गोष्टीचा त्याला विचार करावा लागत नाहीत व त्याला इतर कोणतेहि पाश ओढूं शकत नाही. तो एखाद्या ठिकाणी गेला की तिकडेच त्याचा वेळ जातो
त्याला परत येण्याचे भान राहात नाही. २. एका मनुष्याला अनेक गोष्टींकडे पाहावयास सापडत नाही. तो एका वाटेने गेला म्हणजे बाकीच्या वाटांवर त्याची देखरेख राहात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP