Dictionaries | References आ आपने गल्लीमे कुत्ताभी शेर है Script: Devanagari Meaning Related Words आपने गल्लीमे कुत्ताभी शेर है मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपल्या गल्लीत कुत्रा सुद्धां वाघाचे शौर्य आणतो. आपल्या योग्य स्थळी असल्यावर एखादी दुर्बल व्यक्तीहि बराच पराक्रम करू शकते. तु०- नक्रः स्वस्थानमासाद्य गजेन्द्रमपि कर्षति। स एव प्रच्युतः स्थानाच्छुनापि परिभूयते।। ‘‘जर्मनीला सांभाळून घेण्याला इंग्लंडचा मुख्य प्रधान लॉईड जॉर्ज हा मनांतून तयार होता. व प्रेसिडेंट विल्सननें तिर्हाईतपणे सुचविलेल्या नुसत्या चौदा मुद्यांत वस्तुतः जर्मनीला विशेष अपमानास्पद असे काही नव्हते. पण ‘नक्रःस्वस्थानमासाद्य गजेंद्रपमपि कर्षति’ या न्यायानें म्हणा किंवा ‘आपके गलीमें कुत्ता शेर’ या न्यायानें म्हणा क्लेमॉंसोचा वरचढपणा गाजत होता.’’ -केसरी २५-६-४०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP