Dictionaries | References

आधण

   
Script: Devanagari

आधण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ādhaṇa n See अधण.

आधण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Ebullition; charge; boiling water.

आधण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  डाळ ,तांदूळ इत्यादी शिजवण्यासाठी तापवलेले पाणी   Ex. आधणात तांदूळ शिजवल्यास भात खूप मऊ होतो
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benগরম জল
gujઆંધણ
hinअदहन
kanಎಸರು
kasتوٚت آب , اَدۂن
kokआदन
malഅടുപ്പത്ത് വച്ച വെള്ളം
mniꯑꯁꯥꯕ꯭ꯆꯐꯨ꯭ꯃꯍꯤ
oriଅଦହନ
tamஉலைநீர்
telఎసరు
urdادہَن
See : उकळी

आधण     

 न. 
विस्तवावर तापविल्यामुळें कढत होऊन उकळूं लागलेलें पाणी ; उकळण्यासाठीं विस्तवावर ठेवलेलें पाणी . जरि अमृत घालुं आंधणा । कापुरु मेळउ इंधना । - ऋ ५१ .
त्या प्रकारची पाण्याची अवस्था ; उकळी ; कढ . ( क्रि० येणें ).
गूळ , काकवी , वगैरे करण्यासाठीं काहिलींत कढण्यासाठीं घातलेला उंसाचा रस .
( ल . ) राज्य , एखादा कारभार , संसार इत्यादि व्यवस्थित चालविण्याविषयींची जबाबदारी किंवा भरंवसा ( सामा . ) ओझें ; भार ; जबाबदारी . ( क्रि० ठेवणें ).
अपमृत्यु ; आधाण पहा . [ सं . आदहन ; प्रा . आदाण ; तुल० गो . आधन ] जिवावरचें आधण उतरणें - आलेलें मोठें संकट आपोआप नाहींसें होणें , टळणें .
०निवविणें   मकरसंक्रांतीच्या दिवशीं सुवासिनी स्त्रीनें ब्राह्मणाच्या घरीं जाऊन त्याच्या चुलीवर ठेवलेल्या आधणांत ( भाताच्या भांड्यांत ) तांदुळांत सोन्यारुप्याचा तुकडा घालून ते वैरणें . म्ह० आधणांतले रडतात आणि सुपांतले हांसतात ( सुपांतल्या तांदुळावरहि आधणांत पडून रडण्याचा प्रसंग येतो )= आज जे सुखांत आहेत त्यांना भावी दु : खाची कल्पना नसली तरी तें प्राप्त होतेंच , तें सृष्टिनियमाला अनुसरुन आहे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP