Dictionaries | References

आट्यापाट्या

   
Script: Devanagari

आट्यापाट्या     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एकाने दुसर्‍याला ठरावीक जागेत - पाटीत - अडकवायचे आणि दुसर्‍याने निसटून जाण्याचा प्रयत्न करायचा ह्या स्वरूपाचा एक महाराष्ट्रीय खेळ   Ex. मुले व्यायामशाळेपुढे आट्यापाट्या खेळत होती.

आट्यापाट्या     

 स्त्री. एक महाराष्ट्रीय खेळ . एकानें दुसर्‍यास ठराविक जागेंत - पाटींत - अडवावयाचें व दुसर्‍यानें त्याला हुलकावणी देऊन निसटून जावयाचें अशी खेळाची ठोकळ रुपरेषा आहे . यांत खेळणार्‍यांच्या दोन बाजू असून दर बाजूकडे सुमारें आठ गडी असून त्यांत एक सूरकरी व सात पाटी धरणारे गडी असतात . सुराचा उभा पट्टा असून पाटीच्या आडव्या पट्ट्या असतात . [ सं . अष्ट + पट्टिका ; का . आटा = खेळ ; पाट द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP