Dictionaries | References ल लोण { lōṇa } Script: Devanagari Meaning Related Words लोण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The name of a plant growing in salt marshes. 2 Saltness or saline matter in a soil.from beyond the lines or ground-traces of this play; such earth betokening the winning of the game. v आण, ये, दे. लोण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A term in the play आट्यापाट्या. Earth (as brought or run for) from beyond the lines or ground-traces of this play; such earth betokening the winning of the game.v आण, ये, दे. लोण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. एक कापडाची जात . - मुंव्या १२३ . स्त्री. न. आट्यापाट्यांच्या खेळांत सगळ्या पाट्यांतून निघून जाऊन पलीकडची थोडीशी माती परत आणणे ; किंवा अशी परत आणलेली माती . ( क्रि० आणणे ; येणे ; देणे ). अशी माती आणली म्हणजे डाव जिंकला असे समजण्यांत येते . [ सं . लवण ]०बारगळणे एखादा नियम उल्लंघिल्या कारणाने निरुपयोगी होणे किंवा फुकट जाणे . असा आजपर्यंत कोणी राज्यकर्त्याने किंवा शास्त्रकाराने कायदा किंवा कानू केलेला आठवत नाही की अमुक एक विषयास अमुक अमुकच पृष्ठे लागावी . ती शास्त्रोक्त मर्यादा उल्लंघिली की लोण बारगळले . - चिपळूणकर . मागून आलेले लोण पुढे पोंचविणे ( आट्यापाट्यांच्या खेळांत एखादा गडी सगळ्या पाट्यांतून पार जाऊन परत येण्यास निघाला म्हणजे तो लोण घेऊन येऊं लागला असे म्हणतात . हे लोण तो वाटेंतील गड्यांस शिवून देतो . यावरुन ) मागून आलेली चाल पुढे चालविणे . जे आपले आचार विचारांच्या कसोटीला लावीत नाहीत ते गाढ विश्वास श्रृंखलांनी निगडीत ज्ञाल्यामुळे मागून आलेले लोण डोळे मिटून पोंचविणे एवढेच आपले कर्तव्य समजतात . - आगरकर . लोणपाट्या ( स्त्रीअव .); लोणपट , लोणपाट न .खार्या पाण्याच्या आश्रयाने खाडी इ० च्या कांठी रुजणारे एक प्रकारचे गवत .लवण ; मीठ . लाविल्या लोण न लगे ज्यासी । लोणलक्षण त्या काय पहासी । ते तंव नाणावे पंक्तीसी । चबी त्यासी पै नाही । - एरुस्व १८ . ४८ .आट्यापाट्या ; मृदंगपाट्या .जमिनींतील क्षाराचा अंश .( फक्त शेवटचा शब्द ) खेळांतील सरशी ; जय .सिंध प्रांतांतील उमरकोट व शहाबंदर येथील एका विशिष्ट झाडाच्या राखेपासून तयार केलेला पापडखार .( ल . ) उतारा ; ओंवाळणी . [ सं . लवण ; प्रा . लोण ; गु . लुण ; सिं . लुणु ; पं . लूण ]०उतरणे दृष्ट काढणे ; मीठ मोहर्या ओंवाळून काढणे . तुम्हां निद्रा मज आज्ञा ते स्वभावे । उतरुनी जिवे जाइन लोण । - तुगा ४३७ .०करणे ओंवाळणे ; ओंवाळून टांकणे . सकल तीर्थाचिये धुरे । जिये का मातापितरे । तयां सेवेसि कीर शरीरे । लोण कीजे । - ज्ञा १७ . २०७ . लोण A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 लोण in comp. for लवण. लोण The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 लोण [lōṇa] See लवण. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP