Dictionaries | References

अरुवार

   
Script: Devanagari
See also:  अरुवाळ

अरुवार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Commonly अरवार.

अरुवार     

वि.  कोमल , नाजूक , मऊ , मृदु , सुंदर , सुकुमार , हळुवार ;
वि.  खुसखुशीत , हलका .

अरुवार     

वि.  
कोमल ; नाजूक ; मृदु ; सुंदर ; मऊ ; हळुवार ; सुकुमार . कीं अरुवरें करें । विचित्रा धातुचीं सपुरें । - ऋ ७८ . कां अन्न लाभें अरुवारें । रांधितिये उणें - ज्ञा १८ . १४२ . रातोत्पल सुकुमार । त्याहूनि पदें तुमचीं अरुवार । - रावि १३ . ५९ . कीं कमळिणी सुकुमार ... कीं शिरस फूल अरुवार । क्षणमात्रें कुचुंबे । - हरि २ . १३५ .
खुसखुशीत ; हलकी ; हळु . एक सच्छिद्रें अरुवार । नवनीतसडगें गोडसीं । - मुआदि २९ . ८४ .
हलकें . वाळल्या अनुतापकाचरिया । वैराग्य - तळणें अरुवारिया । - एरुस्व १४ . १०८ . [ हळुवार . का . अरळु = फूल ]. - न . मृदु शय्या . महा सुखाचे अरुवरीं । - परमा १२ . ७ . तो असे क्षीरसागरीं । निद्रिस्त शेषाचे अरुवारीं । - कथा २ . ५ . १५७ . अरवार पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP