Dictionaries | References

बेहडा

   
Script: Devanagari
See also:  बेहाडा , बेहेडा , ब्याहडा , ब्याहडी , ब्याहाडा

बेहडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
See explained under बेडा.
bēhaḍā a Commonly ब्याहडा.

बेहडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक औषधी झाड   Ex. ह्या जंगलात बेहड्याची बरीच झाडे आहेत.
MERO COMPONENT OBJECT:
बेहडा
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बेहेडा
Wordnet:
asmভোমোৰা
bdभावरा
benবহেড়া
gujહરડાં
hinबहेड़ा
kanತಾರೆಕಾಯಿ
kasبَہیڑا
kokरिट्याचो रूख
malതാന്നി മരം
mniꯕꯍꯦꯔꯥ
nepबर्रो
oriବାହାଡ଼ା
panਬਹੇੜਾ
sanअक्षवृक्षाः
tamதான்றிக்காய் மரம்
telతాండ్ర చెట్టు
urdبہِیڑہ , بہِیڑ , بہیرا , برا
noun  बेहड्याच्या झाडाचे फळ   Ex. बेहड्याच्या आत मगज असतो व त्याने गुंगी येते.
HOLO COMPONENT OBJECT:
बेहडा
HOLO MEMBER COLLECTION:
त्रिफळा
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बेहेडा
Wordnet:
benবয়ড়া
gujબહેડું
kokबहेडा
malസംവർത്തകമരം
panਬਹੇੜਾ
sanअक्षः
tamதான்றிக்காய்
telతాండ్ర పండు
urdبہیڑا , بہیڑ , بلیلہ

बेहडा     

 पु. एक औषधी झाड व त्याचें फळ . ( फळांना हेळ्याचीं किंवा धटिंगाचीं फळें म्हणतात ). याचें झाड फार उंच वाढतें व विस्तारहि बराच होतो . फळाच्या आंत मगज असतो त्यानें गुंगी येतें . याचा लेह खोकल्यावर औषधी आहे . या झाडाला डिंक येतो . फळांचा कातडीं कमावण्याकडे उपयोग होतो . [ सं . बिभीतक ; प्रा . बहेडओ , बहेडय ; हिं . बहेडा ]
 पु. एखाद्या खात्यांतील नोकरचाकर , त्यांचा पगार , हुद्दा इ० बद्दलचें तपशीलवार पत्रक ; अंदाजपत्रक ; नेमणूक ; सरकारी नियम इ० सरकारी अधिकार्‍यासाठीं बांधून दिलेले , सरकारी कामकाजाच्या वहिवाटीचे नियम . सालमजकुरीं गडबडीमुळें बेहेड्याचे नेमणुकेपेक्षां जास्ती लोक ठेवणें . - वाडसमा ४ . २ . [ हिं . ] बेहडापार - क्रिवि . पत्करलेलें कार्य कसेंहि करुन शेवटास नेऊन . ( क्रि० करणें ; होणें )
 पु. अडचणीची जागा ; उंचसखल जागा ; खाचखळग्यांची जागा . ' त्याजकडील माणसें बहुत मारली गेलीं . तेव्हां पलोन नदीच्या बेहडांत गेला .' - पेद २१ . २९ ; ' अंधारी रात्र बेहडाची जागा . शेवटी पलोन गेला .' - पेद २१ . २९ . ' वेत्रवतीचें कांठीं मोठमोठें बेहडे म्हणजे खांचा हजारों फौज राहील अशा पडलेला आहेत .' माप्र ९४ . बेहेडा पहा . ( हिंदी - बीहड . सं . बिकट ?)
वि.  
टणक ; निबर .
पक्व झालेलें . ब्याहडा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP