|
पु. १ ( गायन ) एक चीज . मिय्या शौरी यानें ही चीज तयार केली . हिचा विषय शृंगार . काफी , खमाज , भैरवी इ० रागांत बहुधा ही वापरतात . हींत तानबाजी फार लागते . २ ( ताल ) यांत १६ मात्रा व ४ विभाग असतात . पु. १ चेंडू , बाण , बंदुकीची गोळी यांच्या मार्याचें अंतर , फेंक , मर्यादा . २ अंतर ; दोन रेघांतील - गांवांतील अंतर . त्या गांवास दहा कोसांचा टप्पा आहे . ३ विसाव्याची किंवा थांबण्याची जागा ; विशेषत : डांक पोचविणारे धावते नोकर किंवा हमाल अथवा घोडे यांची अदलाबदल होते ती जागा ; ठेवलेली डांक ; टेकडीवरील , घाटामधील विश्रांतीचें ठिकाण किंवा चढ ; जिन्यावरील मधली थांबण्याची आडवी जागा . ६ चेंडूची उशी . ७ शिवण्याची एक तर्हा . ८ ( ल . ) प्रवाह ; ओघ ; आटोका ; कल ; कक्षा ( भाषण , मन , धारणाशक्ति यांचा ). जसजसें वर जावें तसतसा पृथ्वीचा अधिकाधिक भाग नजरेच्या टप्प्यांत येतो . ९ देशविभाग ; घेरा ( मोठें शहर व त्याखालील भोंवतालचीं खेडीं मिळून ) देश पहा . ११ ( बांध काम ) जई पहा . ( इं . ) ऑफसेट . [ का . टप्पा , टप्पे ] ०खाऊन १ मध्यें खालीं पडून पुन्हां उसळून पुढें जाणें ; उशी घेणें ( चेंडू इ० ). २ ( ल . ) ताबडतोब परत येणें ( दूत , निरोप्या ). ३ गमतगमत , मध्यें विसांवा खाऊन येणें . येणें १ मध्यें खालीं पडून पुन्हां उसळून पुढें जाणें ; उशी घेणें ( चेंडू इ० ). २ ( ल . ) ताबडतोब परत येणें ( दूत , निरोप्या ). ३ गमतगमत , मध्यें विसांवा खाऊन येणें . ०खाणें १ थांबणें ; विसावा घेणें ( बोलतांना , वाचतांना ). २ टप्पाखाऊन येणें पहा . टप्यांत येणें = आटोक्यांत आकलनशक्तींत येणें . टप्पे लावणें - मुक्कम दर मुक्काम करणें . ०गुजरा पु. तोफांचा धमधमा ; उंचवटा . तटोतट टप्पेगुजरे बांधून ... - मराआ ३३ .
|