जाणवणी स्त्री. - सूचना ; इषारा .
- जाणीव . ऐसी होतां जाणवणी - रास १ . १२९ .
वि. - जाणता ; समजणारा ; निपुण . तरी जाणां नेणां सकळां । - ज्ञा ५
. १६ .
- ज्ञानवान ; बुध्दिवान ; वजनदार ; विचारशील . जाण मनुष्यावर
संकटीं उपकार केला असतां तो विसरत नाहीं .
- लक्ष घालणारा ; मानणारा ;
काळजी घेणारा . नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण । - तुगा १४९२ .
दरिद्र्यांचा जाण विक्रमसजा ।
- कृतज्ञ ; प्रत्यौपकारशील . जाण मनुष्यावर
संकटीं उपकार केले असतां तो विसरत नाहीं .
- सज्ञान ; अज्ञान , अजाण
नसणारा . साखरेचा इंद्रावण घडू । जाणा गोड नेणा कडू । - एभा २८ . ४६७ .
- भोक्ता ; रसिक . परि सौरभ्य नेलें तिहीं । भ्रमरीं जाणीं जें । -
माज्ञा १५ . ५९४ . [ सं . ज्ञान ; प्रा . जाण ] ( वाप्र . )
स्त्री. - ज्ञान ; ओळख .
- कृपा , दया यांची जाणीव , कृतज्ञता ; प्रत्युपकारशील वृत्ति .
- नोकरीचा किंवा श्रमाचा गौरव ; गुणज्ञता ; गुणाचें चीज करणें ; गुणग्राहकता . ( क्रि० जाणणें ). आम्ही श्रम केला पण त्याची जाण त्यानें जाणली .
न. ( गो . ) जिणें पहा .
०असणें ( म्हैस ) तिला जसजसें खाणें घालावें तसतसें तिचे कासेस अधिक दूध येत असणें .
जाणउ , जाणऊ ( काव्य . ) जाणों ; असें जाणलें , मानलें जावो ; असा विचार केला जावो .
जाणपण न. - ज्ञान ; विद्वता . संतापुढें जाणपण । सर्वथा आपण न मिरवावें ।
- एभा ३ . ३५७ .
- जाणतेपण . जाणपणें न पिएति आंब । - शिशु ८४ .
- अस्तित्व . तेवीं द्वंद्वांचें जाणपण जाणवी असे जें ज्ञान । - एभा ३ .
४११ .
जाणवाय स्त्री. ( गो . )
- शहाणपणा .
- जाणीव . तो डोळयांनी अधू
म्हणायाची जाणवाय ठेव .
जाणवाय वि. ( गो . ) फाजिल प्रौढी बाळगणारा ; चढेल
. तूं फारच जाणवाय झाला आहेस .
जाणसळ , जाणसाळ वि. चतुर ; जाणणारा ; जाणता पहा .
जाणसळ , जाणसाळ स्त्री. चातुर्य ; नैपुण्य ; ओळख ; माहिती .
जाणसळणें , जाणसाळणें अ.क्रि जाणत असणें ; चतुर असणें ; निपुण असणें ; अनुभव आणि
व्यवहार असणें ; व्यवहारांत घटणें .
जाणसळणें , जाणसाळणें स.क्रि. परीक्षा करणें ; कसोटीस
लावणें ; अनुभव पाहणें .