अवतारवाणी - भजन संग्रह १

संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.


भजन संग्रह १

मंगलाचरण

हे समरथ परमात्मा, हे निर्गुण निरंकार ।

तू कर्ता है जगतका, तू सबका आधार ।

कण - कण में है बस रहा, तेरा रूप अपार ।

तीन काल ऐ सत्य तू, मिथ्या है संसार ।

घट- घट वासी है प्रभु, अविनाशी करतार ।

दया से तेरी हो सभी, भव सागर से पार ।

निराकार साकर तू, जग का पालनहार ।

है बेअन्त महिमा तेरी, दाता अपरम्पार ।

परम, पिता परमात्मा, सब तेरी सन्तान ।

भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण ।

एक तुं ही निरंकार (१)

तू ही निरंकार ! धन्य धन्य सदगुरु !

परम पिता परमात्मा तू कण कण बासी ।

तू कर्ता आणि करवीता आहे सर्वही तुजपाशी ।

अंग संग पाहोनी तुजला विनती करी 'अवतार' सदा ।

राजांचाही तु महाराजा मी दासांचा दास तुझ्या ।

रंग रूपाहूनी भिन्न हे प्रभु कोटी कोटी प्रणाम तुला ।

मन बुद्धी चिंतनातील तू कोटी कोटी प्रणाम तुला ।

अनंत असीम अंथाग स्वामी कोटी कोटी प्रणाम तुला ।

राजांचा अधिराज स्वामी कोटी कोटी प्रणाम तुला ।

अदि अनादी सर्व व्यापका कोटी कोटी प्रणाम तुला ।

युगे युगे तारीयले पापी कोटी कोटी प्रणाम तुला ।

सर्व घटांचा अंतर्यामी कोटी कोटी प्रणाम तुला ।

नाम तुंच अन् नामी तूची कोटी कोटी प्रणाम तुला ।

सर्व जगाचा पालनकर्ता कोटी कोटी प्रणाम तुला ।

'अवतार' म्हणे हे प्राणाधारा कोटी कोटी प्रणाम तुला ।

आश्रय तब आधार तुझाची तन मन ओवाळीन माझे ।

म्हणे अवतार करीतो दाता आठ प्रहर गुण गान तुझे ।

होते नसे जोवर तव आज्ञा कुणा चालणे शक्य नसे ।

कांही न करु शके 'अवतार' तव इच्छेने होत असे ।

*

एक तुं ही निरंकार (२)

रूप तुझे अणुरेणुमाजी पानो पानी नांव तुझे ।

इकडे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभु रूप तुझे ।

चंदनामध्ये तूच सुगंध गंगेमाजी निर्मलता ।

तेज तूच रवि किरनामाजी चंद्रामाजी शीतलता ।

पुष्पामाजी तूम सुंदरता कलिकेमाजी कोमलता ।

विद्वानात तुझी विद्वता तूच कला अन् कौशलता ।

पूर्ण गूरु आहेस 'बूटा' तू दशम द्वार असे तव देश ।

'अवतार' म्हणे दिधली सदगुरुने अपुली भाषा अपुली भाषा अपुला वेष ।

*

एक तूं ही निरंकार (३)

सत्य असे मम पूजा सत्याचे या सत्य विचार ।

सत्य आचरु वाटू सत्य सत्य हाच माझा व्यवहार ।

सत्याने मज सत्य दाविले त्यात बांधिली जीवन तार ।

सत्य आधारे रचना सत्य सत्याचा मी करीतो प्रचार ।

समावले सर्वागी सत्य सत्य हेच मग प्राणाधार ।

सत् लहरी सागरही सत्य सत् नौका सत् बल्हविणार ।

सन्मार्गी सत्याचा ठेवा करीन सत्याचा व्यापार ।

एकची केवळ आहे सत्य घटघटवसी जो निरंकार ।

सत्य दाविले 'बूटासिंहाने' कृपा करूनी अपरंपार ।

'अपतार' म्हणे या सदगुरु चरणी सर्व समर्पिन वारंवार ।

*

एक तूं ही निरंकार (४)

ठाव न घेऊ शके मन बुद्धी दयानीधीची दया महान ।

कृपावंत तू होता स्वामी गरीबानां करीसी धनवान ।

कृपा करी जर स्वयं हा स्वामी होईल सेवक जग सारा ।

कृपा करी जर निरंकार हा करी विद्वानही निरक्षरा ।

कृपा करी जर सदगुरु पुरा देईल किर्ती महानता ।

कृपा करी जर सदगुरु पुरा देईल जगती महानता ।

कृपा करी जर सदगुरु पुरा जग अपुले करवू शकतो ।

कृपा करी जर सदगुरु पूरा जे वाटे ते करू शकतो ।

मजपाशी ना काही शक्ति निमित्त मी परी तू करीसी ।

'अवतार' मजवरी कृपा गुरुची ऐका सारे जगवासी ।

*

एक तूं ही निरंकार (५)

मानव मी मानवा सारिखा इतरा जैसा देह मला ।

ज्ञानांजन घालून गुरुने ज्ञान दृष्टी दिधली मजला ।

बोलतोय ही दया गुरुजी त्याचे लेख उच्चरीतो ।

सदगुरुच्या या कॄपेने सदा निरंकार पाहू शकतो ।

ज्या समयी मी झालो याचा झाला हा माझा निरंकार ।

मानीन याला देईन याला हाची असे माझा व्यापार ।

निरंकार हा गुरुकॄपेने मनी माझ्या येऊनी बसला ।

स्नेह असा या प्रियकराचा रोम रोम अंतरी भरला ।

चालतसे मी त्या मार्गाने जो मज याने दाखविला ।

'अवतार' म्हणे ते कार्य करीन मी दर्शविले याने मजला ।

*

एक तूं ही निरंकार (६)

निरंकाराची आज्ञा मजला दूर करावे अज्ञाना ।

निरंकाराची आज्ञा मजला घडवावे चुकलेल्यांना ।

निरंकाराची आज्ञा मजला प्रगट करावा निरंकार ।

निरंकाराची आज्ञा मजला मुक्त करावा हा संसार ।

निरंकाराची आज्ञा मजला करण्या एकाचाच प्रचार ।

निरंकाराची आज्ञा मजला एकाचा करण्या व्यापार ।

निरंकाराची आज्ञा मजला तिमीर मिटविण्या जगताचा ।

निरंकाराची आज्ञा मजला सकला पवित्र करण्याचा ।

दिली जरी धक्की जगताने कार्य सोडणे शक्य नसे ।

'अवतार' प्राण जावो की राहो कर्मत्याग हा शक्य नसे ।

*

एक तूं ही निरंकार (७)

नाशिवंत आहे तन माझे मज नाही त्याची चिंता ।

गेला जरी संपती सारी मज नाही त्याची चिंता ।

सत्याची वैरीण ही दुनिया बोल बोलती जरी नाना ।

सत्याची वैरीण ही दुनिया देईल दोष जरी नाना ॥

सत्याची वैरीण ही दुनिया सत्य बोलण्या घाबरते ।

सत्याची वैरीण ही दुनिया सर्व काळ निंदा करीते ।

गटबाजी अन अनेक पंथी गडबड गोंधळ माजविती ।

अंध जगत हे विसरूनी दाता टाहो फोडुनिया रडती ।

सारे जग जरी झाले वैरी मार्ग सोडणे शक्य नसे ।

म्हणे 'अवतार' वचन गुरुचे कुणा तोडणे शक्य नसे ।

*

एक तूं ही निरंकार (८)

सत्य मार्ग आचरीला ज्यांनी त्यांचे वैरी बनले ।

संत जनांनी कष्ट सोशिले अभिमाने नाही भरले ।

संतजनांना हे मनमानी अल्पमती ऐसे म्हणती ।

स्वार्थासाठी हे मनमानी संतांशी झगडे करीती ।

स्वतः भटकूनी तेच गुरुला भुला भटका म्हणताती ।

खंत न त्याची संतजनाना ध्यान तयावरी ना देती ।

धर्म जाणतो म्हणती तयांनी वैर जगी या वाढविले ।

कट्ठर पंथी पंडित यांनी फतवे अनेक काढियले ।

आले तेव्हा कदर न केली दीप मढ्यावर लावियती ।

'अवतार' म्हणे हे मूर्ख जगी या अपुला हट्ट न सोडिती ।

*

एक तु ही निरंकार (९)

औषधी ना होई गुणकारी जर पथ्या पाळीले नसे ।

बोले मुखाने करी न कराने कार्य सिद्धिला जात नसे ।

मिळे न चरणधुळी संताची ज्याचा मनी सत्कार नसे ।

अशक्य टिकणे ज्ञान अंतरी जर गुरुवर विश्वास नसे ।

गुरुवाचोनी ज्ञान न उपजे टिकत नसे ज्ञानविण ध्यान ।

जव ना मानी पांच प्रणांना अशक्य मिळणे ब्रह्माज्ञान ।

*

एक तूं ही निरंकार ( ९ क )

सर्व श्रेष्ठतम अशी देणगी दिधली सुंदर तुज काया ।

पण तू समज अनामत प्रभुची सर्व माल हा परावीया ।

चालून तूं मनमानीपणाने सदा सदा कष्टी होशी ।

सकळांनी मानावे माझे अभिमान ऐसा धरीशी ।

महाल माड्या कुटुंब कबीला असे तुझ्यापाशी माया ।

दृष्टमान हे सारे मिथ्या चलती फिरती ही छाया ।

हिला प्रभूची देन समजूनी लाभ यातुनी जो घेई ।

रोग अहंमचा न लगे त्याला सौख्य भरे जीवन होई ।

ज्याची वस्तु त्याची समजा काम नसे तक्रारीचे ।

म्हणे 'अवतारे' प्रण हा पहिला तन मन धन हे देवाचे ।

*

एक तूं ही निरंकार ९ (ख)

सर्वाभुती असे एक ज्योती पुरुष असो किंवा नारी ।

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरिजन प्रभुची सृष्टि असे सारी ।

एक प्रभुची रचना सारी देह एक जैसे असती ।

जात पातीची व्यर्थची झगडे लोक उगे कां आचरती ।

हिंन्दु मुस्लीम सिख ईसाई एक प्रभुची ही संतान ।

संर्वासंगे प्रेम करी तू सर्व लेकरे प्रभुची जाण ।

एक ज्योत सकळांत प्रभुची कोण थोर अन् कोण लहान ।

नदी नाले गंगेत मिसळता पवित्र तेही गंगा जाण ।

समान मानुनी सकलांना सोडी मनाचा तुं अभिमान ।

म्हणे 'अवतार' प्रण ह दुसरा वर्ण जातीचा सोडी मान ।

*

एक तूं ही निरंकार (९ ग )

या धरतीवर सर्व ऋतुंचे भिन्न विभिन्न आहे स्थान ।

अलग अलग आहे पेहेरावा खान पानही तैसे जाण ।

अन्न सेवनावरती प्राण्या प्रभुचे ना बंधन कांही ।

आहार हा आधार तनुचा आत्मा खात पीत नाही ।

स्थिर करोनी मनास प्राण्या कांहीं थोडा करी विचार ।

तुझे काय नुकसान करीते कुडता धोतर किंवा विजार ।

रुचेल ते तूं खा पी आणि वस्त्र घाल तुज आवडती ।

उपदेशक होऊनी परी तूं नको क्लेश वाढवू जगती ॥

'अवतार' म्हणे हा ईश्वर मिळतो मान घालवीता मनीचा ।

तिसरा प्रण हा घृणा न करणे खाणा पिण्या वसनाचा ।

*

एक तूं ही निरंकार ( ९ घ )

परिवाराचा त्याग करोनी उगाच धक्के खाऊ नको ।

गृहस्थाश्रमी सदा असावे निकली वेष तू करु नको ।

वेष धरुनी भीक मागूनी होऊ नकोस तू बेजार ।

स्वकष्टाची करी कमाई होऊ नको दुसर्‍यावर भार ।

मानी गोड प्रभु इच्छेला व्यर्थ समय तू दवडु नको ।

म्हणे 'अवतार' चौथा प्रण हा गृहस्थी सोडूनी जाऊ नको ।

*

एक तूं ही निरंकार ( ९ ड )

सोनाराच्या सवे बैसूनी अलंकार ना घडवु शके ।

योग्य जाहला कितीही शिष्य शिक्षक तो म्हणवू न शके ।

विद्यार्थी जो विद्या शिकतो शिक्षक तो होईल कसा ।

परिपूर्ण होतां विद्यार्थी विद्यादान करी शिष्या ।

ब्रह्माज्ञान जे उघड करीतो ध्यान आपुले हटवू नको ।

'अवतार' म्हणे रे पंचम प्रण हा गुरु आज्ञेवीण खोलू नको ।

*

एक तुं ही निरंकार (१०)

पहा मानवा नीलाअंबरी सूर्य चंद्र तारे बसती ।

अस्थिर आहे चमचम यांची एक दिनी सारे ढळती ।

खाली धरती अग्नी पाणी भव्य असे त्यांचा विस्तार ।

नाश पावती एक दिवस हे ज्यामाजी दिसतो संसार ।

मध्ये जीव आधाश अन् वायू सुक्ष्म रूपे तिन्हीं वसती ।

जूळून असे हा जोड तिंघाचा हे सुद्धां मिटूनी जाती ।

दृष्टीगोचर या नऊ वस्तु माया यांचे नांव असे ।

ब्रह्म दहावे याहुनी न्यारे सर्वामाजी व्याप्त असे ।

होईल नाश ही सारी माया काहीच ना बाकी उरणार ।

म्हणे 'अवतार' हेच सर्व ते याला म्हणती निरंकार ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2009-07-21T07:07:05.1470000