मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|अवतार वाणी|

अवतारवाणी - भजन संग्रह २

संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.


एक तूं ही निरंकार (११)

आकाशाच्या अतीपलीकडे आहे व्यापुन जो दातार ।

ठेवियले समयाच्या गुरुने नांव आज याचे निरंकार ।

ठेवियले जितुके जगती सर्व पसारा असे याचा ।

दीन दुःख्ही भक्तांचा रक्षक रचिता हाची जगताचा ।

हाची नौका हा नावाडी हाची उतरी सागरपार ।

वेद ग्रंथ वर्णीता थकले अफाट हा याचा विस्तार ।

जपा तपाने वश ना होई व्रत कर्माहुन दूर असे ।

म्हणे 'अवतार' की सदगुरु मिळता क्षणात प्रभुचे रूप दिसे ।

*

एक तूं ही निरंकार (१२)

निराकार तो केवळ हाची ज्यास कोणता ना आकार

ज्याचा कोठे नाही किनारा ज्याचा नाहें पारावार ।

मिळून लाखो ग्रंथ पुराणे यशोगान ना करु शकती ।

लाखो तपी तपीश्वर मिळूनी रहस्य ना जाणु शकती ।

सोडूनी अपुल्या हेका प्राणी शरण गुरुला जो येई ।

'अवतार' होय जर कॄपा गुरुची तरीच हे समजुन येई ।

*

एक तूं ही निरंकार (१३)

निरंकार आहे सर्वाचा भिन्न नसे कवणालागी ।

तपि तपीश्वर पाहु न शकले करुन तप हरले योगी ।

असुनही हा कणकनवासी तरी न पाहूं शके कोणी ।

जोवर गुरुकृपा न होई तोवर दिसे न हा नयनी ।

एक प्रभुचा सुगंध भरला पुष्प कळ्य़ा बागेमाजी ।

जळी स्थळी हाची प्रभु भरला आणि अणुरेणुमाजी ।

निरंकार हा वनी उपवनी पानो पानी लपलासे ।

चांदण्यामध्ये शीत होऊनी मधुर रसातुन भरलासे ।

यत्‍न प्रयत्‍न करून हजारो वशीभूत होणे नाही ।

'अवतार' सदगुरु जोवर याचा पटल स्वतः हटवीत नाही ।

*

एक तूं ही निरंकार (१४)

निरंकार हा एकची सत्य केवळ सत्य याचे नाम ।

करता धरता या वस्तूंचा रचिले याने चारही धाम ।

मृत्युचे भय नाही याला कायम दायम आहे हा ।

पूर्ण गुरुच्या कृपाप्रसादे याचा जप तू करीत रहा ।

निर्मळ सत्य सदा असे जो तीन काळ राहील सत्य ।

'अवतार' म्हणे की एकच सत्य नित्य असे हा भगवंत ।

*

एक तूं ही निरंकार (१५)

अंत नसे याच्या रचनेचा नसे अंत विस्ताराचा ।

उगम कोठूनी असे जाहला कळला ना शेवट याचा ।

अगणित याची सदने असुनी शत कोटी नांवे असती ।

कुंठित होई बुद्धी जेथे स्थाने तव ऐसी असती ।

या धरतीच्या खाली धरती त्याही पुढे असे विस्तार ।

जाणुनी घे तू गुरुपासोनी ऐक म्हणे बंधु 'अवतार' ।

*

एक तूं ही निरंकार (१६)

निरंकार हा सदैव सत्य नामी सत्य असे हाची ।

होता आहे राहिल पुढती अती सुंदर रचना याची ।

सर्वश्रेष्ठ तू आहे दाता अती पावन आहे तव धाम ।

तूंच खरा पावन अती पावन अती पावन आहे तव नाम ।

नीच ही होईल महान जगती जाणील जो या उच्चतमा ।

म्हणे 'अवतार' गुरुकृपेने कळे तया याची महीमा ।

*

एक तूं ही निरंकार

लाखो पत्‍न करून प्राणी अनुमन लावू न शके ।

परमेशाच्या या रचनेचे रहस्य कुणी ना जाणू शके ।

अगणित याला कसे लिहावे कोण करील याची गणती ।

माप तुला याला ना पुरती अमाप हा आहे जगती ।

लेख लिहू ना शकले लेखक जिव्ह ना वर्णू शकती ।

म्हणे 'अवतार' पूर्ण गुरुवीण भेद समजणे कठीण अती ।

*

एक तूं ही निरंकार

अपुली करणी आपण जाणे सकलांना हा देत असे ।

गोष्ट ही केवळ निज मुखाने कोणी कोणी सांगतसे ।

ते ते सकलां मिळते येथे जे याला द्यावे वाटे ।

मिळते त्यांना तेच सांगती जे मागावे ते मिळते ।

ऐशा पावन अविनशीला संत बोलती निरंकार ।

याला जाणा आणी समजा ऐक म्हणे बंधू ;'अवतार' ।

*

एक तूं ही निरंकार (१९)

कोणी केली रचना सारी कोण असे बनविणारा ।

कर्ता कारण हा सर्वाचा हाच असे सजविणारा ।

काही निशाणी नाही याची ना गोरा नाही काळा ।

नशा वेगळी आहे याची आहे अमृत मधु प्याला ।

'अवतार' म्हणे किल्ली गुरुपाशी स्वयेची लावियले टाळे ।

भाग्यवंत जो मिळवी चावी आणि खोलीतसे टाळे ।

*

एक तूं ही निरंकर ( २०)

खरे पहातां सृष्टी सारी चाले याच्या आज्ञेने ।

सरी धरती सारी सृश्टी पालन करी करकमलाने ।

पाताळांतही अन्न पुरविणे जबाबदारी असे याची ।

आकाशाहून अतीपलीकडे पहारा देत असे हाची ।

आज्ञेवाचून याच्या कोणी तिळभर ना चालू शकती ।

'अवतार' गुरू कृपेवीण कोणी गुन्हा न हे समजु शकती ।

N/A

References : N/A
Last Updated : July 21, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP