अवतारवाणी - भजन संग्रह ८

संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.


भजन संग्रह ८

एक तूं ही निरंकार (७१)

जोडी तार मनाची प्रभुची जाण तयाला तू करतार ।

तया कृपेने जग हे चाले जगताची तोची दातार ।

हितचिंतक सकलांचा हाची हाची रक्षण करीत असे ।

याच्याकडुनी घेती सारे रीता कुणीही जात नसे ।

ध्यान करी हे मना तू याचे येत नसे जो जात नसे ।

आपण सारे करी अन करवी यासम कोणी दुजा नसे ।

जव ना होई दया प्रभुची मानव काही करु न शके ।

लाख लाखही प्रयत्न करुनी काम न काही होऊ शके ।

भगवंतावीण हे मन मुर्खा काही न येई कामाला ।

'अवतार' म्हणे गुरुचरण धरी जो मिळवील तोची मुक्तीला ।

*

एक तूं ही निरंकार (७२)

सदगुरुच्या चरनाहुन पावन नाही दुसरे तीर्थस्थान ।

गुरुवीना पशु जैसा मानव मनुष्य वनणे अशक्य जाणु ।

गुरु चरणाची धूळ घेऊनी चोळून अंगा स्नान करा ।

तन मन धन साधुच्या चरणी हंसत मुखाने दान करा ।

तोच करी साधुची सेवा ज्या करवी करवीतो हा ।

'अवतार' तोच गुण गाईल याचे मुझे जयाच्या बदवील हा ।

*

एक तूं ही निरंकार (७३)

ईश्‍वरास ज्या शोधी मानव ऐका कुठे राहतो हा ।

संताच्या हृदयांत राहतो रसनेवरती बसला हा ।

समय न येई हा परतुनी जे करणे ते आज करा ।

सारी त्यागुन मान बढाई हरिभक्तांचे पाय धरा ।

धन्य धन्य त्या भक्तजनांची काम जयांनी हे केले ।

धन्य धन्य त्या हृदयी धरुनी अपुल्या जन्मा सार्थकीले ।

प्रभु नामाचा धंदा ज्याचा व्यापारी विरळा याचा ।

'अवतार' असा व्यापारी मिळता वाहीन सर्वपदी त्याच्या ।

*

एक तूं ही निरंकार (७४)

हिरे माणके याहून किंमती समजा संतजनांचे बोल ।

माल तयांचे कठीण करणे समजा ते असती अनमोल ।

यास मानुनी चाले यावर तो नर मिळवी मुक्तीला ।

तरे स्वतः निशंकपणे तो नेई तारून जगताला ।

सदा सर्वदा या देवाची कथा किर्तने श्रवण करी ।

'अवतार' त्यागुनी चतुरपणा तो वचन गुरुचे हृदय धरी ।

*

एक तूं ही निरंकार (७५)

सज्जन याहो मिळून सारे प्रभुचे गुण गाऊं आम्हीं ।

गुरुमुखे जाणून हरिला याचे करुया ध्यान आम्ही ।

नाश होईना कशाप्रकारे वस्तु अशी आपण मिळवू ।

ज्ञान मिळवूनी गुरु कडूनी जन्म मृत्यु आपण चुकवू ।

मनमंदिरी उजळूनी ज्योती याचे स्मरण मनी बसवू ।

सदगुरुपासुन जाणुन प्रभुला घरामध्ये निजघर मिळवू ।

ज्या कारण नरदेह मिळाला सफल तया आपण बनवु ।

'अवतार' गुरुच्या येऊन चरणी सकळ तीर्थें आपण न्हावूं ।

*

एक तूं ही निरंकार (७६)

अणुरेणूमजी हा व्यापक अंगसंग तब वसे सदा ।

पूर्ण सदगुरु मिळेल जेव्हा तोची दुर करी पडदा ।

क्षणोक्षणी हरिनाम जपूनी अहंभावना त्याग करा ।

प्रभुचे केवळ स्मरण करोनी मन चिंतेला दुर करा ।

संत पदी नतमस्तक होऊनी संतांचा सत्कार करा ।

'अवतार' घेऊनी चर्न धुळीला भवसागर हा पार करा ।

*

एक तूं ही निरंकार (७७)

गेला समय न येई हाती अनुताप होईल अंती ।

निरोप येता यमदुताचा नयन तुझे भरुनी येती ।

इष्ट मित्र जे असती सारे तुझीया कमी न येती ।

नाती गोती आणी सोयरी तुला सोडवू ना शकती ।

सदगुरु येईल कामी अंती आणि कशाचे काम नव्हे ।

'अवतार' लेख मागे भक्तांचा यम राजाचे काम नव्हे ।

*

एक तूं ही निरंकार (७८)

पाहिल्यावीना मन ना मानी मानील्यावीना प्रेम नसे ।

प्रेमवीण भक्ती न होई नाव भक्तीवीण तरत नसे ।

गुरु दाखवी गुरु समजावी गुरुच प्रेम खरे शिकवी ।

गुरुवीना भक्ती ना होई करू जाता ती वृथा जायी ।

पूर्ण गुरुला शरण येऊनी ओळख भगवंताची करी ।

'अवतार' गुरुची दृष्टी केवळ जीवनाचे कल्याण करी ।

*

एक तूं ही निरंकार (७९)

सूर्य चंद्र आणी हे तारे दिन रात्री येती जाती ।

धरती पाणी आणि अग्नी सदैवकाळ भ्रमण करीती ।

वायु जीव आकश हे काही अचल अमर अढळ नसती ।

तुलना याची होऊ ना शके निरंकार प्रभु पुढती ।

रंग रूप ना ज्याचे कांही ज्याचा पारावार नसे ।

म्हणे 'अवतार' गुरु न मिळतां निरंकार नयनी न दिसे ।

*

एक तूं ही निरंकार (८०)

पूरा गुरु कधी ना सांगे गंगा अन् यमुनेचे स्नान ।

पुरा गुरु कधी ना सांगे पूजा व्रत अन् पुण्यदान ।

पूरा गुरु कधी ना सांगे वाचन करण्या वेद पुराण ।

पूरा गुरु कधी ना सांगे जंगलवास समाधी ध्यान ।

पुरा गुरु समजावी नराला केवळ एक प्रभुचे ज्ञान ।

पूरा गुरु समजावी नराला केवळ एक प्रभुचे ध्यान ।

पूरा गुर्च्या दृष्टीमाजी सारे मानव एक समान ।

पूर्ण गुरुच्या दृष्टीमाजी उच्च नीच ना थोर लहान ।

ऐसा सदगुरु जरी मिळाला नत मस्तक होऊ आम्ही ।

'अवतार' ऐसीया सदगुरु चरणी अर्पण सर्व करु आम्ही ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2009-07-21T07:21:59.6800000