अवतारवाणी - भजन संग्रह १७

संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.


भजन संग्रह १७

एक तूं ही निरंकार (१६१)

कुठे लिहिले त्यागुन जगता वनांत जाऊनी तप करा ।

कुठे लिहिले गृहस्थी सोडुन मनी अपुल्या संताप करा ।

कुठे लिहिले स्त्री पुत्रांना त्यागुन भलते सोंग धरी ।

कुठे लिहिले साधु होऊन ठोकर खावी घरोघरी ।

कुठे लिहिले त्यागून माया दान करुनी धन लुटवा ।

कुठे लिहिले कष्ट सोसूनी निज देहास बळी चढवा ।

ग्रंथ पुराणे हेच सांगती नत व्हावे सदगुरु चरणी ।

'अवतार' म्हणे संतानी ऐका क्षणी प्रभु घ्या पाहुनी ।

*

एक तूं ही निरंकार (१६२)

महतपाप नर जन्मा येऊन प्रभुदर्शन नाही केले ।

महत्‌पाप नर जन्मा येऊन नाही प्रभु यश गाईले ।

महत्‌पाप नर जन्मा येऊन अभिमना नाही त्यजीला ।

महत्‌पाप नर जन्मा येऊन शरण गरुला ना गेला ।

महत्‌‍पाप नर जन्मा येऊन मन गुरुचरणी न झुकले ।

महत्‌पाप नर जन्मा येऊन दसवे द्वार न जाणीयले ।

महतपाप नर जन्मा येऊन शुद्ध मनाला ना केले ।

महत्‌पाप नर जन्मा येऊन प्रसन्न गुरुला ना केले ।

सकलांचे कल्याण करावे महत्‌पाप हेची आहे ।

'अवतार' नाम जो दान करितो उत्तम दानी तो आहे ।

*

एक तूं ही निरंकार (१६३)

सुतदारा अन नाती गोती मावळती आहे छाया ।

धन दौलत अन महाल माड्या मिथ्या ही सारी माया ।

काळमुखी हे पडेल सारे जे जे आले या जगती ।

अपुले ज्य श्‍वासांना म्हणसी हक्क तुझा ना त्यावरती ।

एकवेळ पाहोनी प्रभुला जो याची महिमा गाई ।

'अवतार' म्हणे ऐशा भक्ताला चौर्‍याऐंशीं फिरणे नाही ।

*

एक तू ही निरंकार (१६४)

मिळून सूंदरता अन् यौवन भुलविले कां व्यर्थ मना ।

महाल माड्या पाहून प्राण्या वाढवीसी कां अभिमाना ।

एक हवेचा झोका आहे देहामाजी जो आत्मा ।

पंचभूत अन पंचवीकारे गृसित विसरला भगवता ।

आहे देव तुझ्या अती जवळी जाणी भेद हा गुरुकरवी ।

'अवतार' म्हणे संतानो तो नर जीवन मुक्तीला मिळवी ।

*

एक तूं ही निरंकार (१६५)

अनेक जिव्हा एक करूनी याचे गाऊ जरी यशागान ।

सफल कवि जगताचे आणुनी उपसांचे जरी करू लिखाण ।

विद्वानांच्या करवी आपण महिमा याचे ऐकु जरी ।

सात समींदर करून शाई केले याचे स्तवन जरी ।

तरिही या बेअंत प्रभुचे अशक्य गाणे गीत असे ।

'अवतार' म्हणे या परब्रह्माचा अंत पहाणे शक्य नसे ।

*

एक तूं ही निरंकार (१६६)

गुरुमार्गी गुरु आज्ञा मानी मनमार्गी करीतो प्रतिकार ।

गुरुमार्गी करी सेवा गुरुची मनमार्गी करीतो तक्रार ।

गुरुमार्गी करी प्रेम मनाने मनमार्गी तो सोंग करी ।

गुरुमार्गी सम अंतर्बाह्य मनमार्गी मनी द्वेष करी ।

गुरुमार्गीचा लाभ रोकडा मनमार्गी मिथ्या व्यवहार ।

गुरुमार्गी हा दृढ विश्‍वासू मनमार्गी ना करी विचार ।

गुरुमार्गी नित्य प्रभु पाहे मनमार्गी त्या शोध करी ।

गुरुमार्गी मनी मान न येई मनमार्गी अभिमान धरी ।

सम रूपें 'अवतार' तयांची भिन्न भिन्न गुण परी असती ।

गुरुमार्गी उपकारी असती मनमार्गी फूका वदती ।

*

एक तूं ही निरंकार (१६७)

डोळे मिटुनी कैसी प्राण्या गाढ झोप आली तुजला ।

जागा होऊन काम तूं ज्यालागी जगती आला ।

गेला समय न येई हाती अनुताप होईल अंती ।

या जगती तू केवळ प्राण्या काही दिवसंचा अतिथी ।

मानव तन अती दुर्लभ आहे सहज मिळाले नाही तुला ।

गर्भातुन तू येता बाहेर विसरलास भगवंताला ।

निजरूपाची जाण न तुजला गुरु करवी घे याची जाण ।

जाण वे वेड्या कोण हा स्वामी ज्याने दिधले तन मन प्राण ।

यमधर्माला काय सांगशी याचा थोडा करी विचार ।

'अवतार' म्हणे तव हाती आहे करी जीत किंवा तू हार ।

*

एक तूं ही निरंकार (१६८)

निज यत्‍नाने प्रीत न उपजे प्रभु इच्छेने होत असे ।

मालवलेल्या मन दीपाला गुरु प्रकाशित करीत असे ।

पूर्ण गुरुवाचोनी कोणी आजवरी ना झाला पार ।

पतीवीना जरी लाखो केले वृथा जाण नारी शॄंगार ।

सत्य पुरुषाला जो जाणी तोची असे सदगुरु पूरा ।

उपदेशी जो केवळ मंत्र ऐसा गुरु असे अधुरा ।

काय करावे अशा गुरुला मन दुविधा जो घालवीना ।

कैसा ज्ञानी जो प्रभुला समीप अपुल्या जाणी ना ।

पूर्ण सदगुरु क्षणात एका देवासंगे भेटवीतो ।

पुनः पुन्हा 'अवतार' गुरुला मस्तक अपुले झुकवीतो ।

*

एक तूं ही निरंकार (१६९)

सुवर्ण होते लोखंडांचे स्पर्श करावे जे परीसा ।

चंदनासवे वृक्ष उपजता होत असे चंदन जैसा ।

असता संगे हंसणार्‍याच्या दुःखी प्राणीही हंसतो ।

मिळतां औषध रोग ग्रसिता झोप सुखाची घेईल तो ।

साबण ज्यापरी मलीन कपडे क्षणत एक साफ करी ।

अशुद्ध जल गंगेत मिसळता गंगाजल होऊन जाई ।

असेल जरी कितीही पापी शरण येई जो संतजना ।

म्हणे 'अवतार' वेळ न लागे मिळेल मुक्ती त्याच क्षणा ।

*

एक तूं ही निरंकार (१७०)

किडा होऊनी अनेक जन्मी नाना दुःखे भोगीयली ।

विंचू मंडुक सर्प होऊनी विटंबना कैसी झाली ।

गाय म्हैस झालास कधी तू गर्दभही झालास कधी ।

कधी झालासी बदक कावळा बगळाही झालास कधी ।

रडत राहिला होता घाणीत विसरूनी अपुल्या प्रभुचे नाम ।

'अवतार' म्हणे गुरु भेटी घेई आता तरी पाहे निजधाम ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2009-07-22T09:07:33.9870000