अवतारवाणी - भजन संग्रह १०

संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.


भजन संग्रह १०

एक तूं ही निरंकार (९१)

पहा पांच तत्वाचे पुतळे भिन्न भिन्न मानव झाले ।

हिन्दु कोनी सिख ईसाई मुसलमान कोणी झाले ।

मनुष्य प्राण्यांच्या बुद्धीमान पडदे पडले तिमीराचे ।

राग अमूंगळ छेडीत बसले हे नर जाती धर्माचे ।

इतुके भुलले हे जगवाले प्रत्यक्षा पाहू न शकले ।

अंधे नेता अंध प्रवासी खड्डे ना यांना दिसले ।

दीप दावीला जरी अंधाना ना करिती विश्‍वास कधी ।

म्हणे 'अवतार' विना गुरु भेटी प्रभु दर्शन होई न कधी ।

*

एक तूं ही निरंकार (९२)

पुसती मार्ग परमेशाचा गारा आणि दगडांना ।

पुसती मार्ग परमेशाचा घंटे मधील नादांना ।

पुसती मार्ग परमेशाचा विटांना अन् भिंतीना ।

पुसती मार्ग परमेशाचा धर्मजातीच्या प्रमुखांना ।

पुसती मार्ग परमेशाचा गंगा जैशा सरितांना ।

पुसती मार्ग परमेशचा वर्षे महिने शतकांना ।

पुसती मार्ग परमेशाचा गीता वेद अन् ग्रंथाना ।

पुसती मार्ग परमेशाचा सांप्रदायिक पंथाना ।

पुसती मार्ग परमेशाचा वेशधारी त्या संतांना ।

पुसती मार्ग परमेशाचा गादीधारी महंतांना ।

पुसती मार्ग परमेशाचा चुकलेल्या पंथस्ताना ।

पुसती मर्ग परमेशाचा निष्ठुर अशा कसाबाना ।

पुसती मार्ग परमेशाचा कब्रस्तान स्मशानांना ।

पुसती मार्ग परमेशाचा जंगल दरी डोंगरांना ।

पुसती मार्ग परमेशाचा कागदावरील चित्रांना ।

पुसती मार्ग परमेशाचा खोट्या पीर फकीरांना ।

पुसती मार्ग परमेशाचा कर्म बद्ध बंदीस्ताना ।

पुसती मार्ग परमेशाचा मार्ग नसे ठावा ज्यांना ।

ठायी ठायी खाऊन धक्के हानी शेवटी पदराला ।

'अवतार' गुरुला शरण येऊनी ना उघडिती दृष्टीला ।

*

एक तूं ही निरंकार (९३)

धरतीमाजी असे सांचले अथांग पाणी भारी जरी ।

काष्टाच्या सर्वागामाजी भरुन राहिला अग्नी जरी ।

जोवर प्रगट मिळे ना पाणी तृष्णा न होई शांत कधी ।

प्रगट जोवरी होई ना अग्नी घडे न क्रिया शिजण्याची ।

जरी पहिली स्वप्नी नौका सागर पार करीत नसे ।

जळता दीपक घरात नसता तिमीर घरातुन जात नसे ।

अन्न न जाई जोवर उदरी क्षुधा शमविणे शक्य नसे ।

'अवतार' गुरु साक्षात न मिळता समज प्रभुची येत नसे ।

*

एक तूं ही निरंकार (९४)

चरण सदगुरुचे अती पावन पावन याची पुजा असे ।

सर्वाहुन पावन गुरुपुजा जो पूजी तो श्रेष्ठ असे ।

दाखविले गुरुने ते सत्य दर्शकही याचा सत्य ।

आहे ध्यान गुरुचे सत्य ध्यान धरी तोची सत्य ।

सदगुरु आहे सत्य जगी या जगताचा रक्षण कर्ता ।

स्वयं सत्य ही खाण अगुणाची आहे हा सदगुण दाता ।

पुण्यवंत अन पावन जगती सत्य मुखाने जे वदती ।

'अवतार' म्हणे सर्वाहुनी पावन सत्यामाजी जे वसती ।

*

एक तूं ही निरंकार (९५)

झाकून ठेवी अवगुण सारे गुरु आपल्या भक्ताचे ।

अती कष्ट अन कठीण समयी कृपाछत्र लाभे गुरुचे ।

मान बढाई देणारा हा भक्त जनांचे गुण गातो ।

आपुल्या नामाला जपवूनी धैर्य सवेकांना देतो ।

मालक सदैव शिष्यजनांना सन्मानाने वागवीतो ।

मालक आपुल्या शिष्यजनांवर क्षणोक्षणी दया करीतो ।

या स्वामीच्या भक्तजनांचा सदैव दर्जा उच्च असे ।

या स्वामीचा सेवक जगती सर्वाहुन अती श्रेष्ठ असे ।

होई कृपाळु मालक ज्यावर महिमा त्याची अपरंपार ।

'अवतार' मानीता आज्ञा त्याची तरेल हा सारा संसार ।

*

एक तूं ही निरंकार (९६)

स्वामीचा जो सेवक आहे सर्वाज्ञा पालन करितो ।

स्वामीचा जो सेवक आहे सदैव जनसेवा करितो ।

स्वामीचा जो सेवक आहे असे गुणांनी तो भरपुर ।

स्वामीचा जो सेवक आहे दुष्कर्मातुन राहे दूर ।

स्वामीचा जो सेवक आहे स्वामी तया संगे राही ।

स्वामीचा जो सेवक आहे हरि रंगी रंगुन राही ।

स्वामीचा जो सेवक आहे प्रभुचे नाम सदा जपतो ।

स्वामीचा जो सेवक आहे लाज तयाची रक्षियतो ।

स्वामीचा जो सेवक आहे तो न कधी तक्रार करी ।

म्हणे 'अवतार' अशा शिष्याचे मालक स्वतः ध्यान करी ।

*

एक तूं ही निरंकार (९७)

वरदहस्त हा ज्यावर ठेवी कांहीही करवू शकतो ।

लहानशा मूंगा करवी हा हत्तीला मारवू शकतो ।

हात गुरुचा मस्तकी ज्याच्या जगताला तो भीत नसे ।

अशा सेवकाचाही सेवक मृत्युनेही मरत नसे ।

जोवर ना प्रभु इच्छा होई कुणी तया मारु न शके ।

मारण तारण याच्या हाती दुजा कुणी मारु न शके ।

विन्मुख मूर्ख विचार करुनी हरला त्याच विचाराने ।

'अवतार' कथितो चिंरजीव तो नाम मनी धरीले ज्याने ।

*

एक तूं ही निरंकार (९८)

तूंही तूंही निरंकार म्हणूनी याचे नित्य स्मरण करा ।

प्राशन हे अमृत करूनी तन सुखी मन शांत करा ।

गुरुमुखाने ऐकून ज्यने नाम हरिचे मिळवियले ।

त्या प्राण्याला विश्वामाजी आणि काहीच ना दिसले ।

नाम हरिचे धन हे त्याचे यौवन जीवन रूप असे ।

यामाजीही मौज मानीतो नामी अंगसंग जाणीतसे ।

प्रेमाने नामाचा प्याला भाग्यवान तो कुणी पीतो ।

रोम रोमी या नाम हरिचे नाम आधारे तो जगतो ।

उठता बसता खाता पीता नाम मुखे उच्चारीतो ।

'अवतार' गुरुला शरण परंतु विरळा कुणी कुणी येतो ।

*

एक तूं ही निरंकार (९९)

मानव जे निशिदिनी तूंही उच्चारिती ।

दुःख असो वा सौख्यामाजी आश्रय देवाचा घेती ।

जे सदगुरुची भक्ति करूनी परमेशाचे गुण गाती ।

ईश्वर त्यांच्यामध्ये नांदतो ईश्‍वरात ते समावती ।

मानी तूं आभार प्रभुचे दुःख असो वा सुख महान ।

घडी आज ही आनंदाची येईल तीही सुखाची जाण ।

भक्तांचे गुण वर्णु कैसे सर्व गुणांचे ते भांडार ।

सर्वगुण संपन्न विधाता महिमा याची अपरंपारा ।

क्षणोक्षणी सदगुरुच्या चरणी ज्या भक्तांचे ध्यान असे ।

'अवतार' म्हणे त्या भक्तामाजी निरंकार भगवंत वसे ।

*

एक तूं ही निरंकार (१००)

माझीया मना आश्रय घे तूं पूर्ण प्रभुच्या भक्तांचा ।

तन मन धन अर्पूनीया सारे करी त्याग कुसुंगाचा ।

निरंकार जाणीला जयाने तोच जगी या असे महान ।

त्रैलोक्याचा मालक तोची ज्यापाशी हे ब्रह्मज्ञान ।

संगत करूनी अशा जनांची लाभे मना खचित शांती ।

दर्शन घेतां अशा जनांचे पाप पुण्य मिटूनी जाती ।

संगत करी तू अशा जनांची इच्छीसी जरी कल्याणा ।

चरण घरी तू अशा जनांचे सकल सोडूनी चतुरपणा ।

येणे जाणे न लगे तुजला जन्म मरण फेरे चुकती ।

'अवतार' गुरुचे चरण पूजीता प्राप्त होय जीवन मुक्ती ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2009-07-21T07:27:08.4470000