मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


‘प्रज्ञा’ शद्बार्थ संकेत जाणे । तो ‘प्राज्ञ’ ऐसें बोलती शाहणे ।
पराची प्रज्ञ ओळखीं मनें । णितिशास्त्री सोज्वळ ॥
लोहो नव्हे, परि अतितीक्ष्ण । काळीज भेदोनि निवटी प्राण ।
तें शस्त्र ओळखे त्या मरण । शन्नुपासाव असेना ॥
विवरगर्भीं असतां प्राणीफ़्फ़ । अग्निनें अथवा सूर्यकिरणीं ।
दाहिला न वचे, सुजाणीं । जाणितलें पाहिजे ॥
मार्ग नोळखे चक्षुहीन । न कळे दिशा केउती काणे ।
अधैर्य पुरुषातें कल्याण । उभय लोकीं असेना ॥
सकामातें न साधे सिद्धि । सुखा न पावे अशांत क्रोधी ।
अधैर्यंवंत ऐश्वर्यपदीं । पावूं न शके सर्वंथा ॥
शत्रुसंबंधीं असावधान । आलस्य निद्रा अधैर्य पूर्ण ।
तेणें आंवतुनियां मरण । निजपालवीं बांधिलें ॥
अमित्रमुखींचा शद्ब सुरस । तो विषकमळाचा सुवास ।
आलिंगनीं मैंदपाश । अतुट कंठीं शिरकला ॥
अन्नस्वरूपें काळकूट । गृहस्वरूपें हव्यवाट ।
द्यूतस्वरूपें पाशकपट । उत्तरोत्तर जाणावें ॥
मन राखोनि सावधवुत्ति । इतोपदेश मानूनि चित्तीं ।
आत्महिताचे गूढ पंथीं । नित्याभ्यासीं वर्तावें ॥
अहोरात्र अटण करितां । तो रात्रीही न चुके पथा ।
नक्षत्र ज्ञानिया सर्वथा । दिशाभुली न पडेचि ॥
हृदयीं वर्तला वृत्तांत । तो पंचप्राणांसींच विदित ।
ज्ञाते आपुला गुहयार्थ । बाहेर प्रगटों नेदिती ॥
ध्रुवमंडळ घालूनि पाठीं । अगस्तिचक्र लक्षूनि द्दष्टीं ।
दक्षिण भेदितां जगजेठी । विजयी झाला हनुमंत ॥
श्रेष्ठ जाणती श्रेष्ठ खूण । हृदयीं स्मरतां श्रीकृष्णचरण ।
अपायकाळीं संकटहरण । उपाय येती सामोरे ॥
मानस धाडिजे कृष्णापाशीं । कृष्णाचि ठेविजे निज मानसी ।
तेणें अरिष्टें भंगोनि आपैसीं । उपाय येती सामोरे ॥
बुडवितां बुडवूं न शके आप । दंशकर्ते सर्प होती अकोप ।
विषें मरतया अमूप । अमृत जोडे प्राशनीं ॥
गृहीं धडकल्या प्रळयाग्नि । विवरमार्ग दे मेदिनी ।
षडिद्रियें चक्रपाणि । सत्त्व रक्षी सातवा ॥
एकटें वनामाझी पडतां । धैर्य देऊनि बुडवी व्यथा ।
अपाय चिंती विष्णुभक्ता । तोचि आधीं विनाशे ॥
रात्रीं उमजे मार्गरेखा । जलसंघनी सांपडे नौका ।
आतुडतां राक्षसमुखा । तेथें रक्षी श्रीविष्णु ॥
भंगोनि विन्घांचा उमाळा । विजयलक्ष्मी घाली माळा ।
आत्मपदाचा सोहळा । भगवद्भक्त पावती ॥
जाळितां न जळे दैत्यकुमर । जाळितां न जळे हनुमान वीर ।
गाई गोपाळांचा भार । जळतां कोणें रक्षिला ?

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP