मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


संजय म्हणे, “कौरवराया । दु:ख पाविजे धरितां माया ।
हेंचि विवेकें जाणोनियां । सर्वत्यागें निघावें ॥
दिसे तितुकें पावें नाश । हाचि जाणिवेमाजी सारांश ।
म्हणोनि आत्मा निउत्य अविनाश । जोडे तेंचि साधावें ॥
ब्रम्हासृष्टीमाजी निश्चिती । असंख्य राजे चक्रवतीं ।
अवतारी पुरुषांच्या पंक्ति । उठोनि गेल्या बहुसाल ॥
सोम सूर्यवंशा आंत । कीर्तिघोष प्रतापवंत ।
चित्रगुप्ताचे हात । तेही लिहितां भागले ॥
ज्यांच्या चरित्रांचीं लेणीं । भूषणें जालीं जगाचे श्रवणीं ।
स्वर्गीं स्तुतीच्या तांबुलेंकरूनी । मुखें रंगली देवांचीं ॥
बहु यज्ञ  बहु दक्षणा । देतां बहुसाल ऋषिब्राम्हाणां ।
नेतां उबगोनि सांडिलें धना । नाम जालें कनकाद्रि ॥
सत्य शौच दया आर्जव । स्वधर्मकर्तीं ईश्वरभाव ।
न्यायनीतीचें गौरव । जींहीं बहुसाल वाढविलें ॥
जींही दानोदकें प्रबळ । जलमय केला ब्रम्हागोळ ।
तेही पातला असतां काळ । वश जाले मृत्पूतें ॥
अभ्रें वितुळलीं निराळीं । नाना बुदबुद विराले जळीं ।
तैसे अचूक काळानळीं । भस्म जाले असंख्य ॥
तुझे पुत्र तंव दुरात्मे । नाश पावले केलेनि कर्में ।
त्यांचा शोक मनोधर्में । करणें हाचि अविवेक ॥
देहेंसी विश्व मिथ्या सकळ । जाणोनि ब्रम्हा चिंतीं निर्मळ ।
तेणें शमेल शोकजाळ । स्वानंदसुख पावशी ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP