मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
दासोपंत ओंव्या

दासोपंत ओंव्या

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


दासोपंतीं केला गीतार्णव मानवा सवा लाख
ग्रंथ परम दुस्तर तो न तयाचि, जसें न वासवाला ख ॥१॥
ओंव्या.
सर्वांचा तूं असशी ईश । यास्तव तुझें नाम जगदीश ॥
जग म्हणायाचें ही भ्रांति नि:शेष । तुझे ठायीं दिसेना ॥१॥
तुज ऐसा नसे दयाळू । तुज ऐसा नसे कृपाळू ।
तुलाच असे माझा कळवळू । कैवल्यकंदा ! करुणार्णवा ? ॥२॥
तूं तो केवळ अद्वय सच्चिदानंद । भक्तवत्सल स्वानंदकंद ।
भक्त्प्रतिपालक हें ब्रीद । तुझें असे रे दिगंबरा ॥३॥
मी जन्मलों ज्यांचे उदरीं । ते बाप राहिले देशांतरीं ।
तूं बाप अससी हृदयांतरी । यास्तव बाहतों तुजलागीं ॥४॥
हा तो यनवरूप व्याघ्र । मज गिळूं पाहे समग्र ।
तरी कृपाशस्त्रें वधून शिघ्र । रक्षी मातें दयाळा ! ॥५॥
आज अस्तास जातां दिनमणी । माझे ब्रम्हात्वास असे हानि ।
हें तो जाणतोस कीम दंडपाणी । दयार्णवा दयाळा ! ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP