मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


देखे प्रचंड महागिरि । विशाळ पर्वताचिया दरी ।
जळें तुंबलीं सरितासरीं । समुद्रतुल्य अगाध ॥
तेथें आम्र निचोल बेल । कवंठ कदंब मधु वाढिन्नले ॥
ताळ हिताळ शाल सरळ । मंदार कांचन तमाळ निर्मळ ।
पिचुमंद देवदार धवळ । अर्जुनवृक्ष अपार ॥
खदिर कंटकी हिवरसादोडे । हिरवे हिंगण व्याहाडे कुडे ।
आवळे पाचुडे कंकाकडे । करंज पांगारे चौफेरी ॥
वेणू कळंक चिविया जाळो । औदुंबर फळले सुगंध फळीं ।
तोरणी लागली घोंसाळीं । खिरणीया टेंबुरणी पिंपरी ॥
अर्क निवडुंग सदा मस्त । मोडितां दिसे दुग्ध श्रवत ।
जैंसे प्रपंची विवेकरहित । सुख खोलती विषयांतें ॥
प्रेसिया वृक्षांचीं अचाट । डांगें लागलीं घनदाट ।
माजी निर्झरोदकाचे पाट । सैरावैरा धांवती ॥
मस्तकें उचलोनी दिनकर । छाये रक्षिला अंधकार ।
माजी श्रापदगणाचे भार । सुरवाडले सुख वस्ती ॥
तिच्या तटाकीं असंख्यात । संशित व्रती वानप्रस्थ ।
श्रौतस्मार्त विधिनिरत । अनुष्ठानी तपस्वी ॥
याजकीं रचोनि होमशाळा । होमकुंडीं प्रदीप्त अनका ।
हवि होमितां रविमंडळा । धूम भेदिती हविर्गंधें ॥
द्वादशपंचाग्नि धूम्रपानें । ग्रीष्मीं रविचक्रावलोकनें ।
वर्षाकाळीं वृष्टि साहणें । शीतकालीं जलशय्या ॥
एक उभे एकचरणीं । एक वातांवुपर्णाशनी ।
ऐशा तपोधनांच्या श्रेणी । असंख्यात देखिल्या ॥
सप्त कोटि महामंत्रें  । अनेक पात्रीं अनेक यंत्रें ।
सांग मंत्रें चतु:षष्टि तेंत्रें । मंत्रोपासक पूजिती ॥
एक मौनी एक स्मरणी । एक साकार मूर्तिंध्यानी ।
एक आत्मानुसंधानी । सोहमस्मि या बोधें ॥
साही अंगें दशलक्षणें । पाठक करिती वेदपठणें ।
साम करिती सामगायनें । अति सुस्वरें ते ठायीं ॥
ते परिसोनी भाष्यकार । म्हणती अर्थानुष्ठान थोर ।
वृथा पठणाची करकर । कंठशोषणा वाउगी ॥
चार्वाक म्हणती शरीरात्मा । एक प्रत्यक्ष प्रमाण प्रतिमा ।
स्वर्ग नरक उभय भ्रमा - । भ्रमें नरक भोगवी ॥
हें ऐकोनि नरेश्वर । मुरारीभट्ट प्रभाकर ।
मीमांसक म्हणती पामर । कर्मचि मुख आचरिजे ॥
संव आवेशे नैख्यायिक । साहित्य उपासक वैशेषिक ।
म्हणती कर्ता ईश्वर एक । कारणभूत जगातें ॥
सांख्य म्हणती सांगा युक्ति । आदिकारण पुरुषप्रकृति ।
त्यापासोनि जगदुप्तत्ति । शैवागम संमतें ॥
हांसोनि बोलिले वेदांति । अवघे आंधळे सिद्धांती ।
सर्व बिंब ऐसी स्मृति । उपनिषदार्थ अनुवादे ॥
परिणामवाद विवर्तवाद । बिंब - प्रतिबिंब जीवेश्वरवाद ।
अन्वयव्यतिरेकाचे शब्द । अनुगत व्यावृत संकेतें ॥
मूळज्ञान तुळाज्ञानें । एकीं अनेक जीवलक्षणें ।
अनेकविद्या पक्षापक्ष हरणें । ब्राम्हाणांसह मुच्यते ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP