मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
विठ्ठल चित्रकवि

विठ्ठल चित्रकवि

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


विठ्ठल कविच्या भलता लंघूं न शकेचि चित्र कूटातें ।
प्रबलतरहि पर जेंवी श्रीरामनिवास चित्रकूटातें ॥१॥

“श्रीमत्कौशिक गोत्र वस्ति नगरीं गौरीपुरीं जाणिजे ।
मुख्य स्नानक बीड तरफेमध्यें नृपें राहिजे ॥
श्रीमद्रुक्मिणीचें स्वयंवर निके संपूर्ण हें वाचिजे ।
ऋग्वेदोत्तम आस्वलायान महाशाखांबुधी आणिजे ॥
वर्णी विठ्ठल दुग्धसागरकुलालंकार चूडामणी ।
पद्यें प्राकृत सप्तसर्ग तिनशें त्रेपन्न चिंतामणि ॥

व्यापारी हरिभक्त विठ्ठल कवी प्रार्थीत नारायणा ।
संरक्षीं सकलांसि ग्रंथ पढती गोवर्धनोद्धारणा ॥

आतां वसंततिलका सखि नाम याचें ।
सिंहोन्नता कलियुगीं मत कश्यपाचें ॥

उद्धर्षिणी मग बरी कथिली ललामें  ।
या द्वापरांत मधुमाधवियुक्त नामें ॥

चापे केतकी मोगरे सुरतरू, जाइजुई शेंवतीं ।
वेणू वेत कणेर मंदपवनें हेलाविती मालती ।

भूपाळें मधुमाधवें वनलता सार्‍या प्रफुल्ला महा ।
वल्लीचें ऋतुचें स्वय्म्वर पटा शार्दलविक्रीड हा ॥

त्यासवें मागुते सस्य वर्षाऋतु ।
ते मेघ धारामृतें वाढवीले ॥
वृत्त हें पैं भलें दंडका वर्णिलें ॥
सत्कवी विठ्ठलें पद्य केलें ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP