मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


भूलिंगासि अधोवदनें । गळत्या लाविल्या अश्रुजीवनें ।
उष्णश्वास धूम्रवर्णें । तीव्र सांडी सकोप ॥
तो अधरसुवासें घोळिला । परिमळ धूप समर्पिला ।
खेद संताप उपजला । ह्दयटवळा दीपकु ॥
वाक्यपुष्पें पुष्पांजुळी । सत्य साक्षीनें राजमौळीं ।
ओपितां तंव तेचि काळीं । अति आश्रर्य वर्तलें ॥
सत्य सत्य शूलपाणि । प्रगट झाला तत्क्षणीं ।
म्हणोनि अंतरिक्षवाणी । होती झाली ते ऐका ॥
“रे रे दुष्यंतराज नृपति ! । झणी अवमानिसी हे सती ।
हे कोपलिया सर्व जगती । जाळूं शके क्षणार्धें ॥”
“वाजी वारण पदाती रथ । ठायीं ठायीं उतरके वनांत ।
ययाती पातला त्वरित । शर्भिष्टेच्या मंदिरा ॥
तीतें जाहला बहु आनंद । नमिलें नृपतीचें पादारविंद ।
सहस्र दार्स चें वृंद । नमस्कारी नृपातें ॥
उदक ठेविलें दासीजनीं । शर्भिष्ठेनें स्वहस्तें करोनि ।
नृपतास अभ्यंग घालोनी । क्षीरोद्क नेसविला ॥
षड्रस अन्नें निपजवून । दिधलें रायासी भोजन ।
दिव्यमंचकीं आरक्त सुमन । वरी निजवी नरेंद्रा ॥
वेळा कर्पूर सुगंधयुक्ता । तांबुल अर्पी धरित्रीनाथा ।
मग संतोषोनि अवलोकिता । राजा वदन तियेचें ॥
जैसी सुवर्णचंपककळी । कीं ओतिली मन्मथपुतळी ॥
अत्यंत तारुण्यभरें लवली । परी विनत सुकुमार ॥
विराजे राजवदनचंद्रिका । भाळीं रेखिला कस्तूरी टिका ।
आकर्णंपर्यंत कज्जलरेखा । नयन तेणें शोभती ॥
द्दढ बिल्व पीनस्तन । वरी मुक्तजाळी विराजमान ।
हृदयीं पदक देदीप्यमान । तेज फांके हृदयाब्जीं ॥
करिशावकशुंडादंड । तैसे सरळ भुजदंड ।
कंकणें रुणझुणती प्रचंड । मदनातें चेतवावया ॥
हरिकटिवरी शोभे धटी । उभी राहे अन्मुख गोरटी ।
नृपासी व्यंकहृष्टी । लक्षीतसे वेल्हाळी ॥”

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP