मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
रमावल्लभदास

रमावल्लभदास

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


अवघा बोले चाले हरि । ज्याची कथा तोचि करी ॥
होऊनियां श्रोता वक्ता । करी आपुली आपण कथा ॥
विश्वव्यापक परिपूर्ण । अवघा एकचि नारायण ॥
कैंचा रमावलाभदास । अवघा हरीचा उल्लास ॥

जय रमावल्लभाजी परमेष्टी गुरुराया ।
तारिले भक्त जगीं सहज अवतरुनियां ॥ध्रु०॥

श्रीगीता भागवत सारासार मथूनी ।
काढिलें निज सार स्वानुभव लाहोनी ।
वैराग्यज्ञानभक्तिबोधप्रकाश करुनी ।
संप्रदाय वाढविला नवविध भजनीं ॥१॥

ग्रंथ थोर ‘चमत्कारी’ टीका पूर्ण संपतां ।
श्रीगुरुदत्तदेवें दिल्ही भेटी तत्त्वतां ।
वैष्णवगति ’ आणि ‘वाक्यवृत्ति’ पूर्णता ।
एवं ग्रंथन्नय कथियले समर्था ॥२॥

सहज लागती पाय धन्य तेथींचे जन ।
दर्शनालागीं भक्त चतुर्विध आपण ।
धांवुनि येती स्वयें देहाभिमान विरोन ।
हरिकथा ऐकतांचि होती पुण्यपावन ॥३॥

पाहतां निजरूप नुरे ठाव मनास ।
एकानेक सर्व भावाभाव निरसे ।
अपार कोंदला जी निरालंब प्रकाश ।
भोगिती स्वानुभवी निजानंद उल्हासें ॥४॥

यापरी तुमचें हो पूर्णपण साचार ।
वानिती प्रेमभावें गुरु आनंद सार ।
पावले ब्रम्हापद सहज निरंतर ।
तें सुख राघवासी दिलें पूर्ण उदारें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP