एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


यदा जयेत्तमः सत्त्वं रजः सङंग भिदा बलम् ।

तदा दुःखेन युज्येत कर्मणा यशसा श्रिया ॥१४॥

रजोवृद्धीचें कारण । देहीं उपजे ज्ञानाभिमान ।

पदोपदीं देखे दोषगुण । वांछी सन्मान प्रतिष्ठा ॥१७॥

नवल रजोगुणाची ख्याती । ज्ञातेपणें कामासक्ती ।

नाना भोग वांछी चित्तीं । तेणें रजाची प्राप्ती अनिवार ॥१८॥

ऐसेनि रजोगुण वाढोनि वाढी । सत्वतमांतें तळीं पाडी ।

त्या रजाची स्वरुपतामोडी । ऐक निरवडी सांगेन ॥१९॥

श्लोकीं त्रैपदीं प्रबळ । रज संगभिदाबळ ।

बोलिला रजोगुण केवळ । तेंचि विवळ हरि सांगे ॥२२०॥

संग म्हणिजे देहाभिमान । भेद म्हणिजे मीमाझेपण ।

बळ म्हणिजे काम गहन। आग्रहो पूर्ण प्रवृत्तीचा ॥२१॥

देहाभिमानें दुःख उठी । भेदें भय लागे पाठी ।

त्या नश्वर देहाचिया पुष्टी । काम्यकामाठी कर्माची मांडी ॥२२॥

ज्या कर्माचेनि कैवाडें । यश श्री उदंड जोडे ।

तें तें कर्म वाढवी पुढें । हें रजोगुणें घडे आचरण ॥२३॥

मी एक पवित्र त्रिजगतीं । माझीच उत्तम कर्मस्थिती ।

प्रवृत्ति मान्यता आसक्ती । जे जाणवी स्थिती राजस ॥२४॥

रजाचें बळ उद्भट । कर्म आदरी अचाट ।

वाढवी कर्मकचाट । तो जाण श्रेष्ठ राजस ॥२५॥

बाहेर दिसे सात्विकस्थिती । अंतरीं कर्मवासना द्रव्यासक्ती ।

ज्यासी प्रिय आवडे चित्तीं । तो जाण निश्चितीं राजसू ॥२६॥;

जेव्हां सत्व रज दोनी गुण । जिणोनि तम वाढे पूर्ण ।

ते काळींचें पुरुषलक्षण । स्वयें नारायण सांगत ॥२७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP