एकनाथी भागवत - श्लोक ९ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


पुरुषं सत्त्वसंयुक्तमनुमीयाच्छमादिभिः ।

कामादिभी रजोयुक्तं क्रोधाद्यैस्तमसा युतम् ॥९॥

इंद्रियनिग्रहो यथोचित । जो शमदमीं सदा क्रीडत ।

शांति वसे जयाआंत । तो जाण निश्चित सात्विक ॥५७॥

जो सदा फळकामें कामुक । वांछी संसारभोगसुख ।

द्रव्यार्थी अतिदांभिक । रजोगुणी लोक तो जाण ॥५८॥

ज्यासी स्वधर्मी नाहीं रती । आवडे अधर्मप्रवृत्ती ।

क्रोधलोभें गिळिली स्फूर्ती । तो जाण निश्चितीं तामसू ॥५९॥

एवं देखोनि कर्माचरण । लक्षिजे पुरुषलक्षण ।

या नांव गा अनुमान । विवेकसंपन्न जाणती ॥१६०॥

सामान्यतः तिन्ही गुण । सांगीतलें निरुपण ।

हें न कळे म्हणेल मन । गुणवृत्ति भिन्न अवधारीं ॥६१॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP