मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय बाविसावा|
श्लोक ४२ वा

एकनाथी भागवत - श्लोक ४२ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


नित्यदा ह्यङग भूतानि भवन्ति न भवन्ति च ।

कालेनालक्ष्यवेगेन सूक्ष्मत्वात्तन्न दृश्यते ॥४२॥

म्हणे ऐक बापा उद्धवा । स्थावरजंगमादि देहभावा ।

काळाचिया काळप्रभावा । लागला नीच नवा जन्ममृत्यू ॥७८॥

अतिसूक्ष्म काळगतीसीं । काळ ग्रासीतसे जगासी ।

या अंगींच्या जन्ममृत्यूंसी । नेणवे जीवासी मायामोहें ॥७९॥

निजमाता बाळवयासी । प्रकटावयवीं लाडवी पुत्रासी ।

तेचि माता प्रौढवयसेंसी । होय त्या पुत्रासी सलज्ज ॥४८०॥

ते बाल्यावस्था काळें नेली । हे प्रौढवयसा नवी आली ।

यालागीं माता सलज्ज झाली । हे काळें केली घडामोडी ॥८१॥

ऐसा नित्य नाश नित्य जन्म । भूतांसी करी काळ सूक्ष्म ।

या जन्ममृत्यूंचें वर्म । नेणती संभ्रम भ्रांत प्राणी ॥८२॥

जो अवस्थाभाग काळें नेला । त्यासवें तो देहचि गेला ।

पुढें वयसा नवी पावला । तो काळें आणिला नवा देहो ॥८३॥

ऐसा संभव आणि असंभवो । नीच नवा काळकृत पहा वो ।

यालागीं त्रिविधविकारीं देहो । स्वयें स्वयमेवो देखिजे ॥८४॥

अतर्क्य काळाची काळगती । भूतें जन्ममृत्यु पावती ।

ते अलक्ष्य गतीचे अर्थी । दृष्टांत श्रीपति दावीत ॥८५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP