ॐ एक दंष्ट्राय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात् ।
या गणेश गायत्री मंत्राचा नित्यप्रति आठ हजार जपाने तीस दिवसापर्यंत जप करावा. जपाने दशांश हवन; हवनाचे दशांश तर्पण व तर्पणाचे दशांश मार्जन करावे. यामुळे विवेकबुद्धीचा विकास होऊन ज्ञान प्राप्त होते; सर्व इच्छापूर्ती यामुळे होते.
अन्य गणपती मंत्र :
१.
ॐ महाकर्णाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ।
हा भविष्यपुराणोक्त गणेश गायत्री मंत्र आहे. याचा वीस दिवसापर्यंत नित्य बारा हजाराच्या संख्येने जप करावा. अशाप्रकारे चोवीस लक्ष जप संख्या पुरी करावी . ज्या साधकास नित्य बारा हजार जप करता येत नाही त्यांनी सहा हजार तरी नित्य जप चाळीस दिवस करावा. हवनादीचे नियम पूर्ववत आहेत. हा मंत्र बुद्धी, विद्या, वैभव इत्यादीची वृद्धी करुन क्लेश नाहीसे करतो.
२.
गं ।
हा बीज मंत्र आहे. नित्यप्रति इच्छित संख्येने जप करीत राहिल्याने परम श्रेय प्राप्त होते. यामुळे साधकाची सर्व संकटे दूर होतात. रुद्राक्षाच्या दहा किंवा पाच माळा जपाव्यात .
३.
ॐ गं गणपतये नमः ।
ओंकार व बीजमंत्र युक्त हा गणेशमंत्र अत्यंत प्रभावशाली आहे. सर्व संकटांना दूर करणारा व अभीष्ट फल देणारा हा मंत्र आहे. नित्यप्रती प्रातःकाल पूर्व दिशेश मुख करुन याचा कमीत कमी एक माला जप करावा . यामुळे ज्ञान व विवेक-बुद्धी जागृत होते. साधकात कवित्व व वक्तृत्वशक्तीचा आविर्भाव होतो.
४.
ॐ नमो भगवते गजाननाय ।
या मंत्राचा एक लक्ष जप केल्याने अनुष्ठान पूर्ण होते. यामुळे सर्व इच्छा पूर्ण होऊन दुःखाचा नाश होतो.
५.
ॐ र्हीं श्रीं क्लीं गौं वरदमूर्तये नमः ।
याचा रोज पाच हजारप्रमाणे वीस दिवसांपर्यंत नित्य प्रति प्रातःकाली जप करावा. हा मंत्र गणपतीची कृपा व अनुकूलता प्राप्त करुन देणारा आहे.
६.
ॐ वक्रतुण्डाय नमः
या मंत्राचा आठ लक्ष जप करणे कल्याणकारी आहे. यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात. जपाचे दशांश हवनादीचा विधी पूर्ववत आहे.
७.
ॐ नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने ।
यस्याऽगस्तायते नाम विघ्नसागरशोषणे ॥
या मंत्राचा जप नित्यप्रती इच्छित संख्येने करावा. ज्ञान प्राप्त होणे व मोक्ष मिळणे याचे विशेष फळ आहे.
८.
ॐ र्हीं श्रीं क्लीं नमो गणेश्वराय ब्रह्मरुपाय चारवे ।
सर्वसिद्धि प्रदेयाय ब्रह्मणस्पतये नमः ॥
इच्छित संख्येने नित्यप्रती जप करावा. याचा दहा लक्ष जप केल्यास सर्व सिद्धी प्राप्त होते.
९.
ॐ र्हीं गं र्हीं महागणपतये स्वाहा ।
१०.
ॐ र्हीं गं र्हीं वशमानय स्वाहा ।
हे दोन्ही मंत्र समान फलकारी व समान बीजमंत्राने युक्त आहेत. म्हणून सर्व इच्छापूर्तीसाठी हे सहज सहाय्यक होतात.