रूदाक्ष मण्यांपासून बनविलेली माला या पिंपळाच्या मधल्या पानावर ठेवावी व वरीलप्रकारे ॐ अंकारापासून ॐ क्षंकारा पर्यन्त सर्व अक्षरांचे उच्चारण करुन पंचगव्याने त्यास आंघोळ घालावी. त्यानंतर खालील ' सद्योजात' मंत्राचा उच्चार करीत शुद्ध जलाने स्नान घालावे.
ॐ सद्योजातं प्रपद्यामि सद्योजाताय वै नमो नमः ।
भवे भवे नाति भवे भवस्व मां भवोद्भवाय नमः ॥
त्यानंतर खालील मंत्र उच्चारणासहित चंदन, अगरु, गंध, इत्यादीने त्याचे घर्षण करावे.
ॐ वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो
रुद्राय नमः कलविकरणाय नमो बलविकरणाय नमः
बलाय नमो बलप्रमथनाथाय नमः सर्वभूतदमनाय नमोमनोन्मनाय नमः ॥
यानंतर खालील मंत्राने धूप दाखवावा.
ॐ अघोरेभ्योथघोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्व सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररुपेभ्यः ।
त्यानंतर रुद्रगायत्री मंत्राने लेपन करावे.
ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ।
त्यानंतर प्रत्येक मण्यावर एक-एक किंवा दहा-दहा किंवा शंभर-शंभर वेळा खालील ईशान मंत्राचा जप करावा.
ॐ ईशानः सर्वविद्यानामीश्वरः सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणोऽधिपति ब्रह्मा शिवो मे अस्तु सदाशिवोय् ।
यानंतर मालेत साध्याच्या इष्ट स्वरुप किंवा इष्ट देवतेची प्राणप्रतिष्ठा करावी. किंवा या मंत्रांनी देव-प्रतिष्ठा करावी.
ॐ ये देवाः पृथिवीषदस्तेभ्यो नमो भगवान्तोऽनुमदन्तु
शोभायै पितरोऽनुमदन्तु शोभायै ज्ञानमयीमक्षमालिकाम् ॥१॥
ॐ ये देवाः अन्तरिक्षसदस्तेभ्य ॐ नमो भगवन्तोऽनुमदन्तु
शोभायै पितरोनुमदन्तु शोभायै ज्ञानमयीमक्षमालिकाम् ॥२॥
ॐ ये देवाः दिविषदस्तेभ्यो नमो भगवन्तोऽनुमदन्तु
शोभायै पितरोऽनुमदन्तु शोभायै ज्ञानमयीमक्षमालिकाम् ॥३॥
ॐ ये मन्त्रा या विद्यास्तेभ्यो नमस्ताभ्यश्चोंनमस्तच्छक्तिरस्याः प्रतिष्ठापयति ॥४॥
ॐ ये ब्रह्मविष्णुरुद्रास्तेभ्यः सगुणेभ्य ओं नमस्तद्वीर्यमस्याः प्रतिष्ठापयति ॥५॥
ॐ ये सांख्यादितत्त्वभेदास्तेभ्यो नमो वर्तध्वं वरोधेनुवर्तध्वम् ॥६॥
ॐ ये शैवा वैष्णवाः शाक्ताः शतसहस्त्रवशस्तेभ्यो नमो नमो भगवन्तोऽनुमदन्त्व गृह्णन्तु ॥७॥
ॐ याश्च मृत्योः प्राणवत्यस्ताभ्यो नमो नमस्तेनैतां मृडयत मृडयत ॥८॥
वरील मंत्रांचे उच्चारण करीत यांच्या अर्थाकडे सुध्दा लक्ष दिले पाहिजे. तो याप्रमाणे आहे.
जी देवता पृथ्वीत विचारणा ( निवास ) करते तिला माझे वंदन असो. हे भगवान ! आपण या सर्व मालेत प्रतिष्ठित होऊन अनुमोदन द्यावे . व पितृगण सुध्दा या ज्ञानमयी मालेला व शोभेला अनुमोदन करीत. जी देवता अंतरिक्षात निवास करते तिला माझे मनन असो. तिनेसुध्दा पितृगणासहित येऊन या मालेत विद्यमान व्हावे .
या विश्वात जेवढे मंत्र व विद्या आहेत त्यांनी या मालेत विद्यमान होऊन जपकर्त्यास कामधेनुस्वरुप व्हावे. ब्रह्मा, विष्णू, रुद्र व त्यांच्या वीर्यास नमस्कार असो . त्यांचे वीर्य या मालेत विद्यमान होवो.
जगात हजारोंच्या संख्येने शैव, वैष्णव व शाक्त विद्यमान आहेत, त्या सर्वांना नमस्कार असो. त्यांनी या मालेस अनुग्रह द्यावा. मृत्यूच्या उपजीव्य शक्तींना नमस्कार असो. त्यांनी प्रसन्न होऊन या अक्षरमालेस सुखदायी बनवावी.
या प्रकारे मालेत सर्वात्मकतेची भावना केली पाहिजे. यानंतर मालेचे विधिपूर्वक खालील मंत्रजपाने गंध, अक्षता, पुष्प धूपादीने पूजन करावे .
माले माले महामाले सर्वतत्त्वस्वरुपिणि ।
चतुर्वंगस्त्वयि न्यस्तस्तस्मान्मे सिध्दिदा भव ॥
ही माला सिध्दिची क्रिया झाली. यानंतर ज्या मंत्राचा जप करायचा असेल त्याचे विधिपूर्वक अनुष्ठान केले पाहिजे.
१ ते १४ मुखी रुद्राक्ष
असंख्य वाचक, साधक, भक्त यांनी पुन्हा पुन्हा केलेल्या विनंतीवरुन आम्ही अनुष्ठानाने सिध्द १ ते १४ मुखी रुद्राक्ष, सर्व देवदेवतांची यंत्रे, गौरीशंकर श्रीफल, शिवलिंग इत्यादी पूजेचे सर्व साहित्य विकण्यासाठी ठेवलेले आहे.
सांगण्यास अत्यानंद होतो की रुद्राक्षासारख्या पवित्र वस्तूचा प्रचार करुन भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा प्रसिध्दी मिळविली आहे. रुद्राक्षाचा प्रसार इतका झालेला आहे की काही असामाजिक तत्त्वाने खर्या रुद्राक्षाच्या ठिकाणी नकली रुद्राक्ष निर्माण केले जात आहेत . पण खर्या रुद्राक्षाची विक्री हा उद्देश्य धरुन जे कार्य चालू केले आहे त्यात देवी भगवती व शंकराच्या आशीर्वादाने आम्ही गिर्हाईकास खर्या रुद्राक्षाची प्राप्ती करुन देतो. या करिता आमचे अनेक प्रतिनिधी दुर्गम स्थानी, जंगले तसेच पहाडी केंद्रात पोहचून सिद्ध, महात्मा, व साधू यांना भेटून रुद्राक्ष आणतात .