विष्णु-गायत्री एक प्रसिद्ध महामंत्र आहे. याच्या जपाने सर्वसिद्धी, शक्ती व ऐश्वर्याची प्राप्ती होते. भयंकर पापहि याच्या अनुष्ठानाने नष्ट होते . धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ यामुळे सिद्ध होतात. याचा जप रुद्राक्ष मालेने चौवीस लक्ष करावा. दशांश हवन करावे.
ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो नारायणः प्रचोदयाच् ।
वरील जपाबरोबर खालील प्रमाणे ध्यान करावे.
यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुवन्ति दिव्यै स्तवैः
वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ।
ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो
यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः ॥
अन्य विशिष्ट विष्णुमंत्र :
खालील प्रमाणे भगवान नारायणासंबंधी अनेक मंत्र दिले जात आहेत. यांच्या जपाबरोबर रुद्राक्षमालेचा उपयोग करावा.
१.
ॐ परमात्मने नमः ।
हा मंत्र सात लक्ष जपाने करावा. त्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात. धम, अर्थ, काम व मोक्ष या करिता हा मंत्र विशेष प्रसिद्ध आहे .
२.
ॐ विषणवे पराज्योतये नमः ।
अज्ञान दूर करण्यास हा मंत्र प्रभावशाली आहे. याचे अनुष्ठान अकरा लक्ष जपाने करावे.
३.
ॐ अच्युताय नमः ।
हा मंत्र स्वास्थ्य, कीर्ती, संपत्ती, दीर्घायुष्य इत्यादी करिता अत्यंत प्रभावकारी आहे. याची सहा लक्ष जपाने सिद्धी होते .
४.
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
भगवानाचा हा द्वादशाक्षरी मंत्र सर्व सिद्धी प्राप्त करुन देणारा आहे. याचे अनुष्ठान बारा लक्ष जपाने होते.
५.
ॐ नारायणाय नमः ।
हा अष्टाक्षरी मंत्र प्रसिद्ध आहे. सर्व इच्छापूर्तीसाठी आठ लक्ष जपान अनुष्ठान करावे.
६.
ॐ नमो नारायणाय ।
यामुळे चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते. आठ लक्ष जपान याची सिद्धी होते.
७.
ॐ अनन्ताय नमः ।
या मंत्र जपाने साधक अनंत शक्ती प्राप्त करतो. सहा लक्ष जपान याचे अनुष्ठान केले जाते.
८.
ॐ क्लीं ह्रुषीकेशाय नमः ।
हा क्लीं बीजाने संपन्न मंत्र सर्व इच्छा पूर्ण करतो. एक लक्ष जपाने याचे अनुष्ठान पूर्ण होते.
९.
ॐ अच्युतानन्त गोविन्दाय नमः ।
हा मंत्र सर्व सिद्धी प्राप्त करुन देणारा आहे. अकरा लक्ष जपाने याचे अनुष्ठान पूर्ण होते.
१०.
ॐ श्रीं श्रीवराय त्रैलोक्यमोहनाय नमः ।
भगवान विष्णूचा हा महाशक्तिशाली मंत्र आहे. याचा साधक सदैव ऐश्वर्य संपन्न रहातो. त्यास केव्हाही दुःख दारिद्रय प्राप्त होत नाही. एक लाख जपाने याचे अनुष्ठान पूर्ण होते. दशांश हवन, हवनाचे दशांश तर्पण व तर्पणाचे दशांश ब्राह्मण भोजन घालावे.