मराठी मुख्य सूची|विधी|पूजा विधी|रुद्राक्ष धारण विधी|
रुद्राक्ष माला भावित

रुद्राक्ष माला भावित

रुद्राक्ष अत्यंत पवित्र, शंकरांना अत्यंत प्रिय, तसेच दर्शन, स्पर्श व जप द्वारा सर्व पापे नष्ट होतात.


पाच गायींच्या दुधाने किंवा पंचगव्य ( गोमूत्र, गोमय, दूध, दही, घृत ) यांनी त्याचे प्रक्षालन करावे. गंधमिश्रित पाण्याने स्नान करावे. अष्‍टगंधाने निवडलेल्या ठिकाणी 'मणिशिला' नावाच्या धातु-पत्र्यावर स्थापित करावे. अक्षता तसेच पुष्पाने पूजन करुन मनाने अ पासून क्ष पर्यंत क्रमशः या प्रकारे भावित करावे.

१.

'ओमंकार मृत्युंजय सर्वव्यापक प्रथमेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ ! हे अंकार तू मृत्यूजेता तसेच सर्वव्यापक आहेस. या प्रथम अक्षात ( मण्यात ) तू प्रतिष्‍ठित हो .

२.

'ओमांकाराकर्षणात्मक सर्वगत द्वितीयेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे आकार ! तू आकर्षण शक्‍तीने सम्पन्न तसेच सर्वव्यापक आहेस. या दुसर्‍या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

३.

'ओमिंकार पुष्‍टिदाक्षोभहर तृतीयेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे इकार ! तू पुष्‍टी करणारा व क्षोभ हरविणारा आहेस. या तिसर्‍या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

४.

'ओमींकार वाक्प्रसाद्कर निर्मल चतुर्थेऽक्षे प्रतिष्‍ठित.

अर्थ - ॐ हे ईंकार ! तू वाणीत प्रसाद गुण उत्पन्न करणारा व स्वच्छ आहेस. या चौथ्या अक्षात ( मण्यात ) तू प्रतिष्‍ठित हो.

५.

'ओमुंकार सर्वबलप्रद सारतर पंचमेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे उंकार ! तू सर्व शक्‍ती देणारा आहेस, तू या पाचव्या मण्यात प्रतिष्‍ठित हो.

६.

'ओमूंकारोच्चाटनकर दुःसह षष्‍ठेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे ऊंकार ! तू उच्चाटन करणारा दुस्सह आहेस. या सहाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

७.

'ओमंकार ! संक्षोभकर चंचल सप्‍तमेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे ऋकार ! तू चित्तात क्षोभ व चंचलता उत्पन्न करणारा आहेस. तू या सातव्या मण्यात प्रतिष्‍ठित हो .

८.

'ओम्‌ऋकार सम्मोहनकरोज्ज्वलाष्‍टमेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे ऋकार ! तू सम्मोहन करणारा उज्वल आहेस. या आठव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

९.

'ओम्लंकार विद्वेषणकर गुह्यक नवमेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे लंकार ! तू विद्वेष उत्पन्न करणारा तसेच अत्यंत गुप्‍त आहेस. या नवव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

१०.

'ओम्लंकार मोहकर दशमेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे लंकार ! तू मोह उत्पन्न करणारा व सात्त्विक आहेस या दहाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

११.

'ओमेंकार सर्ववश्यकर शुध्दसत्वैकादशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ' ॐ हे एंकार ! तू सर्वास वश करणारा, तसेच शुद्ध सात्त्विक आहेत. तू या अकराव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

१२.

'ओमैंकार शुद्ध सात्त्विक पुरुषवश्‍यकर द्वादशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे ऐंकार ! तू शुद्ध सात्त्विक पुरुषांना वश करणारा आहेस. या बाराव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

१३.

'ओमोंकाराखिलवाड्‌`मय नित्यशुद्ध त्रयोदशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ' ।

अर्थ - ॐ हे ओंकार ! तू सर्व वाड‌`मयस्वरुप तसेच नित्यशुद्ध आहेस या तेराव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

१४.

'ओमौंकार सर्व वाङ्‌मयवश्यकर शान्त चतुर्दशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे ओंकार ! तू सर्व वाङ्‌मयास वश करणारा शान्त आहेस. या चौदाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

१५.

'ओमंकार गजादि वश्यकर मोहन पंचदशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे अंकार ! तू हत्ती इत्यादींना वश करणारा व मोहित करण्यास समर्थ आहेस. या पंधराव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

१६.

'ओमःकार ! मृत्युनाशनकर रौद्र षोडशेऽक्षे प्रतितिष्‍ठ । '

अर्थ - ॐ हे अःकार ! तू मृत्यूचा नाश करणारा तसेच रौद्र रुप आहेस. या सोळाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

१७.

'ॐकंकार सर्वविषहरे कल्याणद सप्‍तदशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे कंकार ! तू समस्त विषांचा नाश करणारा व कल्याणप्रद आहेस. या सतराव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

१८.

'ॐ खंकार सर्वक्षोभकर व्यापकाष्‍टादशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे खकार ! तू सर्व क्षोभ उत्पन्न करणारा व व्यापक आहेस. या अठराव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

१९.

'ॐ गंकार सर्व विघ्नशमन महत्तरैकोनविशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे गंकार ! तू सर्व विघ्ने शमन करणारा महान आहेस. या एकोणिसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

२०.

'ॐ घंकार सौभाग्यपद स्तम्भनकर विंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे घंकार ! तू सौभाग्य ( सुख ) देणारा व स्तंभन करणारा आहेस. या विसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

२१.

'ॐ डं`कार सर्वविषनाशनकरोग्रैकविंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ । '

अर्थ - ॐ हे डं`कार ! तू सर्व प्रकारच्या विषांना नष्‍ट करणारा अग्रणी आहेस . या एकविसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

२२.

'ॐ चंकाराभिचारघ्न क्रूर द्वाविंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे चकार ! तू अभिचारास नष्‍ट करणारा क्रूर आहेस या बाविसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

२३.

'ॐ छंकार भूतनाशकर भीषण त्रयोविंशेऽक्षेप्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे छकार ! तू भूतनाशक तसेच भीषण आहेस या तेविसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो .

२४.

'ॐ जंकार कृत्यादिनाशकर दुर्घर्ष चतुर्विशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे जंकार ! तू कृत्या ( करणी ) नष्‍ट करणारा तसेच दुर्घर्ष आहेस . या चोविसाव्या आक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

२५.

'ॐ झंकार भूतनाशकर पंचविंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे झंकार ! तू भूतनाशक आहेत. या पंचविसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

२६.

'ॐ त्रंकार मृत्युप्रमथन षड्‌विंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे त्रंकार ! तू मृत्यूचे मर्दन करणारा आहेस. या सव्विसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

२७.

'ॐ टंकार सर्वव्याधिहर सुभग सप्‍तविंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ । '

अर्थ - ॐ हे टंकार ! तू सर्व व्याधी हरणारा व सौम्य आहेस. या सत्ताविसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

२८.

ॐ ठंकार चन्द्ररुपाष्‍टाविंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे ठंकार ! तू चन्द्रमा स्वरुप आहेस. या अठ्‌ठाविसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

२९.

'ॐ डंकार गरुडात्मक विषघ्न शोभनैकोनविंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे डंकार ! तू गरुड स्वरुप, विषनाशक व शोभामय आहेस. या एकोणतिसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

३०.

'ॐ ढंकार सर्व सम्पत्प्रद सुभग त्रिंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ'

अर्थ - ॐ हे ढंकार ! तू सर्व प्रकारची संपत्ती देणारा आहेस तसेच सौम्य आहेस. या तिसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

३१.

'ॐ णंकार सर्व सिध्‍दीप्रद मोहकरैकत्रिंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे णंकार ! तू सर्व सिध्दि देणारा व मोह उत्पन्न करणारा आहेस. या एकतिसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

३२.

'ॐ तंकार धनधान्यादि सम्पत्प्रद प्रसन्न द्वात्रिंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे तंकार ! तू धन धान्यादि सम्पत्ती यांचा दाता तसेच प्रसन्न होणारा आहेस. या बत्तिसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

३३.

'ॐ थंकार धर्मप्राप्‍तिकर निर्मल त्रयस्‍त्रिंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्था - ॐ हे थंकार ! तू धर्माची प्राप्‍ती करणारा व स्वच्छ आहेस या तेहतिसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

३४.

'ॐ दंकार पुष्‍टिवृध्दिकर प्रियदर्शन चतुस्‍त्रिंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे दंकार ! तू पुष्‍टि वाढविणारा व दिसण्यास प्रिय आहेस. या चौतिसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

३५.

'ओं धंकार विषज्वरघ्न विपुल पंचत्रिंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे थंकार ! तू विष व ज्वर नष्‍ट करणारा व महान आहेस. या पस्तिसाव्या अक्षात ( मण्यात ) विद्यमान हो.

३६.

'ॐ नंकार भुक्‍तिमुक्‍तिप्रद शान्त षट्‌त्रिंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे नंकार ! तू मोक्ष-भोग देणारा आहेस व शान्त आहेस. या छत्तिसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

३७.

'ॐ पंकार विषविघ्ननाशन भव्य सप्‍तत्रिंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे पंकार ! तू विष व विघ्नांचा नाश करणारा व भव्य आहेस. या सदोतिसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

३८.

ॐ फंकाराणिमादि सिध्दिप्रद ज्योतिरुपाष्‍टत्रिंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे फंकार ! तू अणिमादि अष्‍ट सिद्धी प्राप्‍त करुन देणारा आहेस. तसेच ज्योतिस्वरुप आहेस. या अडतिसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

३९.

'ॐ बंकार सर्वदोषहर शौभनैकोनचत्वारिंशेऽ प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे बकार ! तू सर्व दोष दूर करणारा तसेच शोभन आहेस. या एकोणचाळिसाव्या अक्षात ( मण्यात ) विद्यमान हो.

४०.

'ॐ भंकार भूतप्रशान्तिकर भयानक चत्वारिंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे भंकार ! तू भूतबाधा शांत करणारा आहेस व भयानक आहेस. या चाळिसाव्या अक्षात ( मण्यात ) विद्यमान हो.

४१.

'ॐ मंकार विद्वेषिमोहनकरैकचत्वारिंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे मंकार ! तू विद्वेषकर्त्यास मोहित करणारा आहेस. या एकेचाळिसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

४२.

'ॐ यंकार सर्वव्यापक पावन द्विचत्वारिंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे यंकार ! तू सर्वव्यापक व पवित्र आहेस. या बेचाळिसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

४३.

'ॐ रंकार दाहकर विकृत त्रिचत्वारिंशेंऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे रंकार ! तू दाह उत्पन्न करणारा व विकृत रुप आहेस. या त्रेचाळिसाव्या अक्षात ( मण्यात ) विद्यमान हो.

४४.

'ॐ लंकार विश्‍वंभर भासुर चतुश्‍चत्वारिंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे लंकार ! तू विश्‍वाचे भरण करणारा व तेजस्वी आहेस. या चवेचाळिसाव्या अक्षात विद्यमान हो .

४५.

'ॐ वंकार सर्वाप्‍यायनकर निर्मल पंचचत्वरिंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - 'ॐ हे वंकार ! तू सर्वांस तृप्‍त करणारा तसेच स्वच्छ आहेस. या पंचेचाळिसाव्या अक्षरात ( मण्यात ) विद्यमान हो.

४६.

'ॐ शंकार सर्वफलप्रद पवित्र षट्‌चत्वारिंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे शकार ! तू सर्व फल प्राप्‍त करुन देणारा व पवित्र आहेस या शेहेचाळिसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

४७.

'ॐ षंकार धर्मार्थकामद धवल सप्‍तचत्वारिंशेऽक्षे

अर्थ - ॐ हे षंकार ! तू धर्म अर्थ व काम देणारा तसाच उज्वल आहेस. या सत्तेचाळिसाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

४८.

'ॐ संकार सर्वकारण सार्ववर्णिकाष्‍टचत्वारिंशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे संकार ! तू सर्व पदार्थ उत्पन्न करणारा आहेस. या अठ्‌ठेचाळिसाव्या अक्षात ( मण्यात ) विद्यमान हो.

४९.

'ॐ हंकार सर्ववाङ्‌मय निर्मलैकोनपंचादशक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे हंकार ! तू सर्व वाङ्‌मय तसेच निर्मल आहेस. या एकोणपन्नासाव्या अक्षात ( मण्यात ) विद्यमान हो.

५०.

'ॐ ळंकार सर्वशक्‍तिप्रद प्रधान पञ्चादशेऽक्षे प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - 'ॐ हे ळंकार ! तू सर्वशक्‍तिप्रदान करणारा आहेस. या पन्नासाव्या अक्षात ( मण्यात ) प्रतिष्‍ठित हो.

५१.

'ॐ क्षंकार परात्पर तत्त्वज्ञापक परंज्योतीरुप शिखामणौ प्रतितिष्‍ठ ।'

अर्थ - ॐ हे क्षंकार ! तू परात्पर तत्त्वाचा प्रकाश देणारा परम ज्योतिस्वरुप आहेस. या शिखामण्या ( सुमेरु ) त विद्यमान हो.

या प्रकारे प्रत्येक मण्यास भावित करावे. अ पासून ळ पर्यन्त पन्नास मण्यांस भावित करुन पुन्हा ळ पासून अ पर्यन्त मागे यावे. 'क्ष' ला सुमेरु मानतात . म्हणून त्याचे उल्लंघन करु नये. या प्रकारे शंभर मणी भावित होतात. राहिलेल्या आठ मण्यांस अ, क, च, ट, त, प, य, श, या अष्‍टवर्गांवर बिंदू लावून ( अंसार, कंकार, चंकार, टंकार, तंकार, पंकार, यंकार , शंकार, ) पूर्वोक्‍त विधीने उच्चारण करुन भावित करावे. त्यानंतर सुमेरुस क्षंकाराने भावित करावे.

प्रत्येक मणी ओवतेवेळी त्या मध्ये गाठ मारावी किंवा मारु नये. जर गाठ मारावयाची असेल तर अडीच किंवा तीन फेर्‍यांची असावी. किंवा ब्रह्मग्रंथी द्यावी. अंती ब्रह्मग्रंथी देऊन सुमेरु गुंथावा.

रुद्राक्षाचे मुख काहीसे उंच व शेपटी काहीशी चपटी असते. ओवतेवेळी रुद्राक्षाच्या मुखास मुख व शेपटीस शेपटी लावावी. माला गुंफण्यासाठी सोने चांदी यांची तार उपयोगात आणावी .

अशा प्रकारे माला ओवून झाल्यावर तिच्यावर संस्कार केला पाहिजे. त्यासाठी पिंपळाची स्वच्छ नऊ पाने घेऊन ती अष्‍टदल कमळाप्रमाणे मांडावीत. एक पान मधोमध व आठ पाने आठ बाजूस मांडावी . या प्रमाणे कमळाचा आकार होईल.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP