मराठी मुख्य सूची|विधी|पूजा विधी|रुद्राक्ष धारण विधी|
विशिष्ट शिवमंत्र

विशिष्ट शिवमंत्र

रुद्राक्ष अत्यंत पवित्र, शंकरांना अत्यंत प्रिय, तसेच दर्शन, स्पर्श व जप द्वारा सर्व पापे नष्ट होतात.


या ठिकाणी अनेक विशिष्ट शिव-मंत्र दिले जात आहेत. यांच्या प्रयोगात रुद्राक्षमालेचा उपयोग करावा.

ॐ नमः शिवाय ।

हा शंकराचा षड्‌क्षर मंत्र आहे. ओंकाररहित फक्‍त 'नमः शिवाय' पंचाक्षर मंत्र म्हटला जातो. दोन्ही मंत्रांचे समान महत्त्व आहे व हे दोन्ही ईशान मंत्र मानले जातात . यांचे अनुष्‍ठान तेहतीस लक्ष जपाचे आहे. अनुष्‍ठान पूर्ण झाल्यावर घृत्युक्‍त पायसान्नाने दशांश हवन केला पाहिजे. या ईशान मंत्रात ध्यान खालील प्रमाणे करणे .

ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं ।

रत्‍नाकल्पोज्ज्वलाङ्‌ गपरशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम्‌ ।

पद्मासीनं समन्तात्‌ स्तुतममरगणैव्याघ्‍रकृत्तिं वसानं ।

विश्‍वाद्यं विश्‍वबीजं निखिल भयहरं पंचवक्‍त्रं त्रिनेत्रम्‌

 

२.

ॐ र्‍हीं र्‍हौं नमः शिवाय ।

हा भगवान शंकराचा अष्‍टाक्षर मंत्र आहे. अनुष्‍ठान आठ लक्ष जप संख्येचे आहे. यासाठी रुद्राक्षाची माला उपयोगात आणावी. जपाचे दशांश हवन व हवनाचे दशांश ब्राह्मणभोजन केले पाहिजे . या मंत्रजपात ध्यान पुढीलप्रमाणे आहे.

वन्दे सिन्दूरवर्णं मणिमुकुटलसच्चारुचन्द्रावतंसं

भालोद्यन्नेत्रमीशं स्मितमुखकमलं दिव्यभूषाङ्‌गरागम्‌

वामोरुन्यस्तपाणेररुणकुवलयं सन्दधत्याः प्रिया या ।

वृत्तोत्तुंगस्तनाग्रे निहित करतलं वेदटंकेष्‍ट हस्तम्‌ ।

३.

ॐ नमो नीलकण्‍ठाय ।

हा नीलकंठ महादेवाचा मंत्र तीन लक्ष रुद्राक्ष मालेने जपाने जपला पाहिजे. हवन व ब्राह्मण भोजन वरीलप्रमाणे दशांश स्वरुपात आहे. यात ध्यान खालील मंत्राने करावे .

बालार्कायुत तेजसं धृतजटाजूटेन्दुखण्डोज्ज्वलं

नागेद्नैः कृतशेखरं जपवटीं शूलं कपालं करैः ।

खट्‌वाङ्‌ग दधतं त्रिनेत्रविलसत्पंचाननं सुन्दरं

व्याघ्रत्वक्‌ परिधानमब्जनिलयं श्रीनीलकण्ठं भजे ॥

४.

ॐ तत्‍पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्‌ ।

हा रुद्रगायत्री महामंत्र चोवीस लक्ष जपाने सिद्ध होतो. जपासाठी रुद्राक्षमाला उपयोगात आणावी. जप संख्येच्या दशांश हवन केले पाहिजे. हा मंत्र सर्व प्रकारे कल्याण करणारा आहे . याने सर्व अनिष्‍ट, दुःख, संकट, रोग इत्यादी दूर होतात. यात ध्यान पुढीलप्रमाणे करावे .

बन्धकामं त्रिनेत्रं शशिशकलधरं स्मेरवक्‍त्रं वहन्तं

हस्तैः शूलं कपालं वरदमभयदं चारुहासं नमामि ।

वामोरुस्तम्भगायाः करतलविलसच्चारुरक्‍तोत्पलाया

हस्तेनाश्‍लिष्‍टदेहं मणिमयविलसद्‌भूषणायाः प्रियायाः ॥

५.

ॐ नमो भगवते दक्षिणामूर्तये महयं मेधा प्रयच्छ स्वाहा ।

या मंत्राचे अनुष्‍ठान एक लक्ष जपाने होते. त्यानंतर घृताक्‍त कमलाने हवन केले पाहिजे. ध्यान या प्रकारे आहे.

वटवृक्षं महोच्छायं पद्मरागफलोज्ज्वलम्‌ ।

गारुत्मतमयैः पत्रैर्विचित्रैरुपशोभितम्‌ ॥

६.

रं क्षं मं यं औं अं

याचे अनुष्‍ठान एक लक्ष जप संख्येने केले पाहिजे. जपासाठी रुद्राक्षमाला घ्यावी. जप पूर्ण होताच घृत, मध व शर्करायुक्‍त तीळ तांदुळ यांनी दशांश हवन केले पाहिजे . ध्यान पुढीलप्रमाणे आहे.

नील प्रवाल रुचिरं विलसत्‌ त्रिनेत्रं

पाशारुणोत्‍पल कपालक शूलहस्‍तम्‌ ।

अर्द्धाम्बिकेशमनिशं प्रविभक्‍त भूषं

बालेन्दुबद्धमुकुटं प्रणमामि रुपम्‌ ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP